-अनिल भोईर
क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय १७ वर्ष मुले/मुली कबड्डी स्पर्धा २०१८-१९ परभणी येथे पार पडली.
स्पर्धेत राज्यातून एकूण ८ विभागाचे मुलांचे व मुलीचे मिळून एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. बादपध्दतीने सर्व सामने खेळवण्यात आले.
१७ वर्ष खालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद मुलींमध्ये औरंगाबाद विभागाने तर मुलांमध्ये नाशिक विभागाने पटाकवले.
मुलीचा अंतिम सामना औरंगाबाद विभाग विरुद्ध कोल्हापूर विभाग याच्या झाला. चुरशीच्या झालेल्या याअंतिम सामन्यात औरंगाबाद विभागाने कोल्हापूर विभागाचा १ गुणांनी पराभव करत १७ वर्ष खालील मुलीचे राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटाकवले.
मुलाच्या झालेल्या अंतिम सामन्यात नाशिक विभागाने अमरावती विभागाचा एकतर्फी पराभव केला. नाशिक विभागाने ४६-१६ असा विजय मिळवत १७ वर्ष खालील मुलाच्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटाकवले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मुलींमध्ये लातूर विभागाने ४०-३० असा नाशिक विभागाचा पराभव करत तिसरे स्थान पटाकवले. तर मुलांमध्ये झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूर विभागाने मुंबई विभागावर ३५-२० असा विजय मिळवत तिसरा क्रमांक पटकवला.
१७ वर्ष खालील मुले राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २०१८-१९ परभणी (निकाल)
विजेतेपद- नाशिक
उपविजेतेपद- अमरावती
तिसरा क्रमांक- कोल्हापूर
१७ वर्ष खालील मुली राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २०१८-१९ परभणी (निकाल)
विजेतेपद- औरंगाबाद
उपविजेतेपद- कोल्हापूर
तिसरा क्रमांक- लातूर
महत्त्वाच्या बातम्या:
–तब्बल एक वर्षानंतर दिग्गज अष्टपैलू खेळाडूचे टीम इंडियात पुनरागमन
–धोनीसाठी आजचा दिवस खास, बांगलादेशविरुद्ध होऊ शकतो विक्रमांचा विक्रम
–या कारणामुळे सुनील गावस्करांनी फकार जामन आणि दिनेश कार्तिकला सुनावले खडेबोल