पुणे: महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट (पुरुष व महिला) ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात नागपूर संघाच्या महिलांनी २ सुवर्ण व २ कांस्य पदके जिंकून विजेतेपद संपादन केले. क्रीडा प्रबोधिनी संघाला २ सुवर्ण व १ कांस्य पदकासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये आज शेवटच्या दिवशी जान्हवी पाठक, काजल औताडे, शुभांगी राऊत, समिक्षा शेलार, केतकी गोरे, रोहिणी मोहिते अपूर्वा पाटील यांनी आपापल्या वजन गटातील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले.
५७ ते ६३ किलो वजन गटात क्रीडा प्रबोधिनीच्या काजल औताडेने कोल्हापूरच्या रूध्वी श्रुंगारपूरे यांच्यातील लढत सुरूवातीपासून अटीतटीने सुरू झाली. पहिल्या मिनिटात दोघींनी एकमेकींचा अंदाज घेतला. पण नंतर काजलने अचानक रूध्वीच्या खांद्याची पकड घेतली. नंतर काजलने ससाय सुरूकोमी आशी डावाची सुरूवात करून रुध्वीला जमिनीवर पाडत चोकच्या सहाय्याने पराभूत करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला.
६३ ते ७० किलो वजन गटात क्रीडा प्रबोधिनीच्या समिक्षा शेलारने नाशिकच्या दिव्या कारडेलविरूध्द खेळताना पहिल्याच मिनिटात ओगोशी डावाने अर्धा गुण संपादन करून जमिनीवरच कामेशीहो गातामे या डावाने जमिनीवर जखडून ठेवून उर्वरीत अर्धा गुण वसूल करून सुवर्ण पदक आपल्या नावावर केले.
५२ ते ५७ किलो वजन गटात नागपूरची शुभांगी राऊत मुंबईच्या ग्रेहा परमार हीला केसा गातानी या डावाने जमिनीवर जखडून ठेवून पूर्ण गुण संपादन करून सुवर्णपदक जिंकले.
* महिला गटातील विजेता संघ: नागपूर (२ सुवर्ण व २ कास्य); उपविजेता संघ: क्रीडा प्रबोधिनी (२ सुवर्ण व १ कांस्य).
* उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार: पुरूष गट: रणवीरसिंह भोसले (कोल्हापूर); महिला गट: रोहिणी मोहिते (सातारा).
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक रवी पाटील (मुंबई) व सतिश पहाडे (अमरावती) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राज्य संघटनेचे सरचिटणीस शैलेश टिळक, तांत्रिक समिती अध्यक्ष दत्ता आफळे, स्पर्धा संचालक दिपक होले, अनिल सपकाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
* पारितोषिक वितरणापूर्वी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासह ज्युदोमधील द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त दिल्लीचे गुरूचरणसिंग गोगी यांना उपस्थित सर्व पद््धिकारी व खेळाडूंनी श्रध्दांजली वाहिली. गुरूचरणसिंग यांचे निधन शनिवारी पहाटे नवी दिल्ली येथे झाले.
निकाल (महिला गट – सर्व अंतिम):
* ४८ किलो खालील गट: सुवर्ण: रोहिणी मोहिते (सातारा), रौप्य: वैष्णवी पाटिल (कोल्हापूर), कांस्य: श्रध्दा चोपडे वि. वि. भक्ती भोसले (ठाणे) व काजल राऊत (नागपूर) वि. वि. ऐश्वर्या शेळके (सांगली).
* ४८ ते ५२ किलो गट: सुवर्ण: केतकी गोरे (नागपूर), रौप्य: जयंती पाटील (कोल्हापूर), कांस्य: स्नेहल खावरे वि. वि. गौरी शिंदे (सांगली) व दिशा खरे (गोंदिया) वि. वि. गुंजन पाटील (धुळे).
* ५२ ते ५७ किलो गट: सुवर्ण: शुभांगी राऊत (नागपूर), रौप्य: ग्रेहा परमार (मुंबई), कांस्य: विद्या लोहार (नाशिक) वि. वि. कल्याणी उगले (धुळे) व प्रियांका सणस (महाराष्ट्र पोलिस) वि. वि. प्रार्थना गायकवाड (सांगली).
* ५७ ते ६३ किलो गट: सुवर्ण: काजल औताडे (क्रीडा प्रबोधिनी), रौप्य: रूध्वी श्रुंगारपूरे (कोल्हापूर), कांस्य: अश्विनी काळे (अहमदनगर) वि. वि. मेहेक शेख (सिंधुदूर्ग) व तेजस्वीनी बरवाल (औरंगाबाद) वि. वि. संस्कृती चौधरी (वर्धा).
* ६३ ते ७० किलो गट: सुवर्ण: समिक्षा शेलार (क्रीडा प्रबोधिनी), रौप्य: दिव्या कारडेल (नाशिक), कांस्य: श्रावणी साखरे (अमरावती) वि. वि. अश्लेषा इंगवले (पीडीजेए) व हेमा मुळ्ये (अकोला) वि. वि. चैत्राली कालेकर (कोल्हापूर).
* ७० ते ७८ किलो गट: सुवर्ण: जान्हवी पाठक (पीडीजेए), रौप्य: पूजा खानगुतकर (मुंबई), कांस्य: सईली विजेश (ठाणे) वि. वि. शिल्पा शेगावे (सिंधूदुर्ग) व मानसी पाटील (कोल्हापूर) वि. वि. कविरा काळे (महाराष्टÑ पोलिस).
* ७८ किलो वरील गट: सुवर्ण: अपूर्वा पाटील (ठाणे), रौप्य: अनिता निकम (पीडीजेए), कांस्य: इशिता काप्ता (नागपूर) वि. वि. नियती घुलाने (अमरावती) व शांभवी कदम (मुंबई) वि. वि. सानिका गायकवाड (कोल्हापूर)