पुणे। महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने व लातूर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेच्या वतीने १ ते ३ मार्च दरम्यान राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय खेळाडू मोनाली नातूकडे सोपविण्यात आले आहे.
पुणे जिल्हा संघटनेचे सरचिटणीस गजानन पंडित यांनी पुणे जिल्हा संघ जाहीर केला.
पुणे जिल्हा संघ : मोनाली नातू (कर्णधार), दिक्षा पिल्ले, ऐश्वर्या बोडके, फरहान शेख, रितू फ्रान्सिस, अलिझा शेख, मुस्कान शेख, शालू प्रजापती, रेश्मा पुणेकर, धनश्री दरेकर, प्रणाली रणदिवे, नेहा पवार, किरण नवगिरे, नेहा थोरात, दिक्षीता वाझेन, आरती भगत
प्रशिक्षक : प्रा. गुलजार शेख; संघ व्यवस्थापक : विष्णू जाधव.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडिया विजयीरथावर आरुढ! सलग १२ वा टी२० सामना जिंकत ‘या’ दोन संघांची विश्वविक्रमात बरोबरी
तिसऱ्या टी२०साठी मैदानात पाऊल ठेवताच रोहितचा विश्वविक्रम, पाकिस्तानच्या शोएब मलिकला टाकले मागे