मुंबई। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 16व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे हिने तर, मुलांच्या गटात शौनक सुवर्णा या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या शौनक सुवर्णा आईने तिसऱ्या मानांकित दिल्लीच्या कुशाग्र अरोराचा 3-6, 6-3, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून सनसनाटी विजयासह उपांत्य फेरी गाठली. हरियाणाच्या अव्वल मानांकित तविश पाहवा याने महाराष्ट्राच्या दक्ष पाटीलचा टायब्रेकमध्ये 6-0, 4-6, 7-6(0) असा संघर्षपूर्ण पराभव केला. तामिळनाडूच्या दुसऱ्या मानांकित फजल अली मीर याने दिल्लीच्या पाचव्या मानांकित विराज चौधरीचा 6-1, 6-1 असा एकतर्फी पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या दहाव्या मानांकित पार्थसारथी मुंढे हिने चौथ्या मानांकित राजस्थानच्या हविशा चौधरीचा 6-2, 6-0 असा पराभव करून आणखी एका अनपेक्षित निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित हरियाणाच्या आनंदिता उपाध्याय हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत क्वालिफायर महाराष्ट्राच्या सौम्या तमंगचे आव्हान 6-1, 6-0 असे संपुष्टात आणले.
दुहेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या पार्थसारथी मुंढेने एरवा रेड्डीच्या साथीत व्रण्डिका राजपूत व अविका ए.या चौथ्या मानांकित जोडीचा 6-3, 6-0 असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
मुले:
तविश पाहवा(हरियाणा)[1] वि.वि.दक्ष पाटील(महाराष्ट्र) 6-0, 4-6, 7-6(0);
विवान बिदासरिया(मध्यप्रदेश) वि.वि.हृतिक कटकम(तेलंगणा)6-4, 6-1;
शौनक सुवर्णा(महाराष्ट्र)वि.वि.कुशाग्र अरोरा(दिल्ली)[3] 3-6, 6-3, 6-2;
फजल अली मीर(तामिळनाडू)[2]वि.वि.विराज चौधरी(दिल्ली)[5]6-1, 6-1.
मुली:
आनंदिता उपाध्याय(हरियाणा)[1] वि.वि.सौम्या तमंग(महाराष्ट्र)6-1, 6-0;
पार्थसारथी मुंढे(महाराष्ट्र)[10]वि.वि.हविशा चौधरी(राजस्थान)[4] 6-2, 6-0;
प्राची मलिक(हरियाणा)[3]वि.वि.जास्मिन कौर(हरियाणा)6-3, 6-3;
आहान(ओडिशा)[2]वि.वि.एरवा सानवी रेड्डी(तेलंगणा)6-1, 6-1;
दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी:
मुले:
विराज चौधरी/कुशाग्र अरोरा[1] वि.वि.विवान बिदासरीया/आरव ढेकीयल 6-2, 1-6, 10-5;
प्रणित चिट्टीपुदोरागरी/फझल अली मीर[3] वि.वि.हित कांदोरिया/पुरहन यादव 6-4, 6-2;
शिवा शर्मा/दिशेंदर लांबा[4] वि.वि.अनिकेत सिंग/युवान गर्ग 6-2, 6-1;
तविश पाहवा/तक्षम सैनी[2] वि.वि.दर्श पाबूवाल/चांदोग्य पाठक 7-5, 6-4;
मुली:
आनंदिता उपाध्याय/हविशा चौधरी[1] वि.वि.वसुंधरा बालाजी/संमिथा एल 6-4, 6-0;
सूर्यांशी शेखावत/नंदिनी कंसल[2] वि.वि.तेजस्विनी मानेनी/नेशा एंजा 6-1, 6-2;
पार्थसारथी मुंढे/एरवा रेड्डी वि.वि.व्रण्डिका राजपूत/अविका ए.[4] 6-3, 6-0;
प्राची मलिक/अहान[2] वि.वि.रीत अरोरा/जास्मिन कौर 6-2, 6-3.
महत्त्वाच्या बातम्या –