आयपीएल 2023चा 36वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. विराट कोहली सगल तिसऱ्या सामन्यात आरसीबीच्या कर्णधाराच्या रूपात खेळला. या सामन्यादरम्यान बॉलिवुड अभिनेत्री अनन्या पांड स्टार स्पोर्ट्सवर उपस्थित होती. अनन्याने यावेळी विराट कोहलीविषयी एक वक्तव्य केले, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. नेटकरी मोठ्या प्रमाणात तिला ट्रोल करण्याचा प्रयत्नातही दिसत आहेत.
आरसीबी आणि केकेआर (RCB vs KKR) यांच्यातील हा सामना बुधवारी (26 एप्रिल) रोजी बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. यादरम्यान, स्टार किड आणि बॉलिबुड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) स्टार स्पोर्ट्सवर उपस्थित होती. चालू आयपीएल सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि संघासाठी धावाही करत आहे. अशातच अनन्या पांडेने विराटविषयी मोठे भाष्य केले. यावर्षी ‘विराट कोहली ऑरेंज कॅप जिंकेल,’ असे अनन्या पांडे म्हणाली. या एका वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर सध्या जोरात सुरू आहे.
नेटकरी अनन्या पांडेच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहे. अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. काहींच्या मते अनन्या पांडेने ही भविष्यवाणी केल्यामुळे विराटला धावा करण्यासाठी पुन्हा झगडण्याची वेळ येऊ शकते. सोशल मीडियावर याविषयी नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
— User45 (@EdwinMoses45) April 26, 2023
Accha!! aur mera IPL debut kab hai bitiya yeh bhi bata do?
— Akshay Shah – Founder CEO, iWebTechno | GenZDealZ (@AkshayiWeb) April 26, 2023
Gaya orange cap ab, Kohli struggle karega 🫠
— 𝓼. (@Kohlistiano) April 26, 2023
https://twitter.com/Shreyas73246252/status/1651230830956621828?s=20
Usko pata hai kya orange cap q detye hi
— Anish Dalavi (@RahulGa92309099) April 26, 2023
Thankgod Purple Cap nahi bola usne
— Archit Jain (@Archit1307) April 26, 2023
Didi se ipl ki full form puchna koi 🥺
— ❥𝑴𝒂𝒏𝒗𝒊𝒊 (@sprinkles_manvi) April 26, 2023
Bad luck for VK
— Devanshu kr. singh (@Devanshukrsingh) April 26, 2023
Panoti Laga k Gai
— supreme mishra (@MishraSupreme) April 26, 2023
— paz (@CricketPaz) April 26, 2023
दरम्यान उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर कर्णधार विराट कोहलीने याने नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरने 20 षटकात 5 बाद 200 धावा केल्या. सलामीवीर जेसन रॉय आणि कर्णधार नितीश राणा यांनी महत्वाचे योगदान दिले. रॉयने 56, तर राणाने 48 धावा केल्या. आरसीबीसाठी विजयकुमार विशाक आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने याने 19व्या षटकात आंद्रे रसलला त्रिफळाचीत केले. (statement about Virat Kohli cost Ananya Pandey, netizens are trolling her)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
देशासाठी काहीही! दुखापतग्रस्त असूनही विलियम्सन करणार न्यूझीलंडला वर्ल्डकपमध्ये मदत
चिन्नास्वामीवर ‘रॉय’राज! सलग दुसऱ्या सामन्यात ठोकली वादळी फिफ्टी, एकाच षटकात 4 षटकारांची बरसात