---Advertisement---

नोवाक जोकोविचने जिंकले कारकिर्दीतील विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम; वाचा त्याच्याबद्दलची अचंबित करणारी आकडेवारी 

On: सोमवार, जुलै 12, 2021 2:00 AM
---Advertisement---

लंडन। रविवारी (११ जुलै) सार्बियाच्या नोवाक जोकोविचने विम्बल्डन २०२१ चे विजेतेपद जिंकत इतिहास रचला. त्याने विम्बल्डन २०२१ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात इटलीच्या मतेओ बेरेटिनीविरुद्ध विजय मिळवला. हे जोकोविचचे कारकिर्दीतील २० वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. तो २० ग्रँडस्लॅम जिंकणारा तिसरा पुरुष टेनिसपटू ठरला. यापूर्वी असा विक्रम केवळ राफेल नदाल आणि रॉजर फेडररला करता आला आहे.

रविवारी ३ तास २३ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात सार्बियाच्या जोकोविचने सातव्या मानांकित बेरेटिनीला ६-७(४), ६-४,६-४,६-३ अशा चार सेटमध्ये पराभूत केले. या विजयासह जोकोविचने ६ वे विम्बल्डन विजेतेपद जिंकले. जोकोविचने २०११, २०१४, २०१५,२०१८,२०१९ आणि २०२१ या सहा वर्षी विम्बल्डन विजेतीपदं जिंकली आहेत.

जोकोविचने या विजयासह अनेक विक्रम केले आहेत. त्याच्या कारकिर्दीतील काही खास आकडेवारीकडे आज या लेखातून नजर टाकू.

१. सर्वाधिक वेळा ग्रॅंडस्लॅम जिंकणारे पुरुष खेळाडू (अंतिम सामने)
२०- रॉजर फेडरर (३१)
२०- राफेल नदाल (२८)
२०- नोवाक जोकोविच (३०)

२. नोवाक जोकोविच विम्बल्डन स्पर्धेत
१६ वेळा- सहभागी
७ वेळा- अंतिम फेरीत
६ वेळा- विजयी

३. नोवाक जोकोविच २०२१ सालात
ऑस्ट्रेलियन ओपन- विजेता
फ्रेंच ओपन- विजेता
विम्बल्डन- विजेता

४. सर्वाधिक वेळा विम्बल्डनचे विजेतेपद जिंकणारे खेळाडू
८- रॉजर फेडरर
७- विलीयम रेनशॉं
७- पीट सँप्रास
६- नोवाक जोकोविच

५. नोवाक जोकोविचची ग्रँडस्लॅम विजेतेपदं
९ वेळा- ऑस्ट्रेलियन ओपन
६ वेळा- विम्बल्डन
३ वेळा- युएस ओपन
२ वेळा- फ्रेंच ओपन

६. फेडरर, जोकोविच व नदालची ग्रँडस्लॅम विजेतेपदं
ऑस्ट्रेलियन ओपन- फेडरर ६, जोकोविच ९, नदाल १
फ्रेंच ओपन- फेडरर १, जोकोविच २, नदाल १३
विम्बल्डन- फेडरर ८, जोकोविच ६, नदाल २
युएस ओपन- फेडरर ५, जोकोविच ३, नदाल ४

७. गेल्या १४ ग्रँडस्लॅम स्पर्धात नोवाक जोकोविचची कामगिरी
८ वेळा- विजेतेपद-
३ वेळा- विम्बल्डन
३ वेळा- ऑस्ट्रेलियन ओपन
१ वेळा- फ्रेंच ओपन
१ वेळा- युएस ओपन

८. साल २०१० मध्ये
१६- रॉजर फेडरर ग्रँडस्लॅम विजेतेपद
९- राफेल नदाल
१- नोवाक जोकोविच

९. साल २०२१ मध्ये
२०- रॉजर फेडरर
२०- राफेल नदाल
२०- नोवाक जोकोविच

११. साल २०१७ मध्ये जोकोविचने वयाची तिशी पार केली. त्यानंतर आजपर्यंत १४ ग्रँडस्लॅम स्पर्धांत भाग घेताना ८ ग्रँडस्लॅम विजेतेपदं जिंकली आहेत.

१२. नोवाक जोकोविचला विम्बल्डनच्या अंतिम फेरीत (२०१३) केवळ अँडी मरेने पराभूत केले आहे. जोकोविचने नदाल (२०११), फेडरर (२०१४, २०१५, २०१९), अँडरसन (२०१८) आणि बेरेटिनी (२०२१) यांना पराभूत केले आहे.

१३. जोकोविचने कारकिर्दीत किमान दोन वेळा चारही ग्रँडस्लॅमची विजेतीपदं मिळवली आहेत.

१४. जोकोविचने त्याच्या प्रत्येक प्रतिस्पर्धाविरुद्ध किमान एकदा तरी विजय मिळवा आहे.

१५. सर्वाधिक ग्रँडस्लॅम अंतिम सामने खेळणारे पुरुष खेळाडू
३१ – रॉजर फेडरर
३० – नोवाक जोकोविच
२८ – राफेल नदाल

महत्त्वाच्या बातम्या – 

दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडला पराभवाचा धक्का देत मालिकेत केली बरोबरी

विम्बल्डनचा अंतिम सामना पाहाण्यासाठी ‘देसी गर्ल’ची उपस्थिती, पाहा फोटो

“श्रीलंकेचा दुसर्‍या दर्जाचा संघात मैदानात उतरला, तर मालिकेला काहीच अर्थ राहणार नाही”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---