आयपीएलमध्ये गुरुवारी (1 ऑक्टोबर) झालेल्या 13 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने किंग्स इलेव्हन पंजाबला 48 धावांनी पराभूत केले. मुंबईच संघाने प्रथम फलंदाजी करताना 191 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला 20 षटकांत मात्र 143 धावाच करता आल्या.
आयपीएलमध्ये बरेच विक्रम होतात आणि तुटतातही, या सामन्यात तब्बल 8 विक्रमांची नोंद करण्यात आली, त्यावर आपण नजर टाकू.
-या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलच्या कारकिर्दीतीत 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित हा तिसरा खेळाडू आहे.
-या सामन्यात आणखी एक विशेष विक्रम नोंदविला. वास्तविक, आयपीएल 2020 मध्ये 11 व्या वेळी नाणेफेक जिंकणार्या संघाने हा सामना गमावला.
-मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आपला 14 वा विजय नोंदविला आहे.
-या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलच्या कारकिर्दीतील 38 वे अर्धशतक पूर्ण केले.
-पंजाबचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात पहिला चौकार लगावत आयपीएलमध्ये 200 चौकार पूर्ण केले आहेत.
-पंजाबचा सलामीवीर मयंक अगरवालने या सामन्यात 25 धावा केल्या, तो आयपीएल 2020 मधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत 246 धावा केल्या आहेत.
-मुंबईचा सलामीवीर सूर्यकुमार यादव या हंगामात दोन वेळा धावबाद झाला आहे.
-या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबच्या वेगवान गोलंदाजांनी एकूण 7 गडी बाद केले आहेत.