कालचा सामना अनेक कारणांसाठी अविस्मरणीय राहिला मग भुवनेश्वर कुमारची वनडे मधील सर्वोत्तम कामगिरी असो वा कर्णधार कोहलीचे ३० वे शतक असो. या सर्व कारणांमुळेच कालचा सामना जिंकून भारत श्रीलंकेवर निर्भेळ यश मिळवू शकला.
नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंकन कर्णधार उपुल थरंगाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लाहिरू थिरीमाने आणि अँजेलो मॅथ्यूज यांच्यात शतकी भागीदारीच्या जोरावर यजमानांना २३८ धावांचे आव्हान उभे करता आले. त्यानंतर दोन चेंडू शिल्लक असताना श्रीलंकेचा संघ सर्वबाद झाला.
प्रतिउत्तर देताना भारताने दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांना लवकर गमावले. पण कोहली व मनीष पांडे यांनी धावांचा पाठलाग करत संघाला विजयच्या जवळ नेले त्यानंतर पांडे बाद झाला. त्यानंतर केदार जाधवने ही अर्धशतकी खेळी केली. जिंकण्यासाठी दोन धावा हव्या असताना केदार बाद झाला. कर्णधार आणि शतकवीर कोहली या विजयाचा शिल्पकार ठरला.
एक सामना ज्यात एवढे विश्वविक्रम झाले त्यातील ह्या विक्रमांची मांडणी ओघानेच आली
#५- दोन देशांत खेळवलेली ही ५ सामन्यांची पहिली मालिका आहे ज्यात पहिल्यांदाच दोन वेगवान भारतीय गोलंदाजांनी ५ बळी घेतले आहेत.
#१००- एमएस धोनी हा वनडे क्रिकेटमध्ये १०० यष्टिचित करणारा पहिला खेळाडू बनला.
#१५ – दोन देशांत खेळवलेलया ५ सामन्यांच्या मालिकेत १५ विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह हा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे.
#२ – भारतीय वनडे क्रिकेटच्या ९२२ सामन्यांच्या इतिहासात प्रथमच दोन रिस्ट स्पिनर एकाच सामन्यात खेळले. युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव हे ते गोलंदाज.
#४ – निरोशन डिकवेल्लाने ५ सामन्यात चार वेगवेगळ्या सलामीवीरांबरोबर फलंदाजी केली आहे. दानुष्का गुणातिलका(पहिले २ सामने ), दिनेश चंडिमल( ३रा सामना ), दिलशान मुनावीरा (चौथा सामना) आणि उपुल थरांगा (पाचवा सामना ) हे ते सलामीवीर.
#१५ – जसप्रीत बुमराने या मालिकेत १५ विकेट्स घेतल्या आहेत. ५ सामन्यांच्या मालिकेत एवढ्या विकेट्स घेणारा तो पहिला खेळाडू आहे. या आधी १४ विकेट्स पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलँडच्या क्लिंट मॅकेने घेतल्या होत्या.
#३ – विराट कोहली हा पहिला कर्णधार बनला आहे ज्याने ३ वेळा ५ सामन्यांच्या मालिकेत सर्व सामने जिंकले आहेत.
#१ – कसोटी आणि वनडे अशा एकाच दौऱ्यात पाहुणा संघाने यजमान संघाला एकही सामना जिंकू दिला नाही असे होण्याचो ही पहिलीच वेळ आहे.
#१ – भारत हा असा पहिला संघ बनला आहे ज्याने श्रीलंकेवर श्रीलंकेत निर्भेळ यश मिळवले आहे.
#५ – बांगलादेश आणि झिम्बाब्वे सोडून भारताने प्रथमच कुठल्या संघाला ५-० ने मात दिली आहे.
#३ – सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली (७४) आता वनडेमध्ये ५० किंवा त्यापेक्षा आधी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे त्याच्या आधी या यादीत ए बी डिव्हिलर्स (७७) आणि महेंद्रसिंग धोनी (७५) हे खेळाडू आहेत.
#४ – विराट कोहलीने २०१७ मध्ये ४ शतके केली आहेत . असे करणारा तो पहिला खेळाडू आहे.
#५ – विराटने २०१७मध्ये वनडेमध्ये १००० धावा पूर्ण केल्या त्याने अशी कामगिरी पाचव्यांदा केली आहे. त्याआधी सचिनने ७ वेळा आणि गांगुली, संगकारा, रिकी पॉंटिंगने ही कामगिरी ६ वेळा केली आहे.
#५ – भुवनेश्वर कुमारने कालच्या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत. वनडे कारकिर्दीत असे करण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. या मालिकेत या सामन्या आधी त्याने ३ सामन्यात १ ही विकेट घेतली नव्हती.
#५ – विराट कोहलीने सलग २ सामन्यात शतक करण्याची ही पाचवी वेळ होती.
#६ – भारतीय क्रिकेट संघाने सहाव्यांदा मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. कोहलीने तीनवेळा, महेंद्रसिंग धोनीला दोनदा आणि गौतम गंभीरने एकदा कर्णधार असताना अशी कामगिरी केली आहे.
#८ – कोहलीचे श्रीलंकेविरूद्धचे हे आठवे एकदिवसीय शतक आहे, जे श्रीलंकाविरूद्ध कुठल्याही फलंदाजाचे सर्वाधिक शतके आहेत. सचिन तेंडुलकरनेही श्रीलंकेविरुद्ध ८ शतके लगावले आहेत.
#३० – हे विराट कोहलीचे ३०वे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक होते, तो सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा आहे, सचिन तेंडुलकर (४९) त्याच्या पुढे आहे. आता तो रिकी पॉन्टिंगच्या ३० शतकाशी बरोबरीत आहे.
#१०० – लिस्ट अ प्रकारात कोहली हा १०,००० धावा कारणारा १०० वा खेळाडू आहे. असे करणाऱ्या खेळाडूंमध्ये बेवननंतर त्याची सर्वाधिक सरासरी आहे.
#१८६ – विराटने सर्वात कमी डावात ३० शतके केली आहेत. त्याला ३० शतके करायला १८४ डाव लागले तर तेंडुलकरला २६७ आणि रिकी पॉंटिंगने ३४९ डाव घेतले होते.
#५ विराट कोहलीने सलग दोन सामन्यात शतकी खेळी करण्याची ही ५वी वेळ होती. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सने ६वेळा अशी कामगिरी केली आहे.
#८ भारतीय संघाचा वनडे कर्णधार म्हणून ही कोहलीची ८वी शतकी खेळी होती
#३० विराटने १८६ वनडे इंनिंगमध्ये ३० शतके केली आहेत. सचिनने एवढ्याच डावात १६ तर पॉन्टिंगने १५ शतके केली होती.
#१०१७ विराट कोहलीने यावर्षी १८ सामन्यात ९२.४५ च्या सरासरीने १०१७ धावा केल्या आहेत. यावर्षी वनडेमध्ये १००० धावा करणारा विराट पहिला खेळाडू आहे.
#२८ वयाच्या २८व्या वर्षी विराटने ३० वनडे शतके केली आहेत.
#९२.४५ या वर्षी ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटची सरासरी ही सर्वात जास्त अर्थात ९२.४५ आहे. दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी असून धोनीची सरासरी ९१.३३ आहे.