---Advertisement---

भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी काय दिला होता सल्ला, प्रशिक्षकांनी केला खुलासा

---Advertisement---

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने उत्तम प्रदर्शन केले आहे. भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी (२ ऑगस्ट) नवा इतिहास रचला आहे. उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला १-० ने पराभूत केल्यानंतर महिला संघाने प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. भारतीय संघाच्या नेत्रदीपक विजयानंतर जगभरातून हॉकी संघावर शुभेच्छा वर्षाव होता आहे.

या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय महिला हॉकी संघांवर ट्विटरवर सातत्याने अभिनंदन केले जात आहेत. यासोबतच भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक सोर्ड मार्जेनने यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शॉर्ड खूप भावनिक झालेले दिसून येत आहेत.

सोर्ड मार्जेन या ऐतिहासिक विजयानंतर प्रतिक्रिया देत म्हणाले की, ‘फरक फक्त हात आहे की स्वतःवर विश्वास ठेवणे आणि त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणे, त्यानंतर हे तुमच्या भूतकाळावर लक्ष देत पुन्हा वर्तमानात जाण्याबाबत आहे. मला वाटते की, ही महत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही तेच केले. जर तुम्ही हरलात तरी तुम्ही विश्वास ठेवा, मी हेच मुलींना सांगितले होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानात राहणे.’

‘मी त्यांना एक चित्रपट दाखवला आणि तो चित्रपट वर्तमानात राहण्याबद्दल आहे. मला वाटते की, ते खरोखर उपयुक्त होते. आयर्लंड विरुद्ध खेळताना आम्ही त्या चित्रपटाचा उल्लेख करत राहिलो होतो,’ असेही ते पुढे म्हणाले.

मार्जेन यांनी भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षकपद देखील सांभाळले आहे. त्यांचा जन्म २० एप्रिल १९७४ रोजी झाला आहे. ते हॉलंडचे माजी हॉकीपटू राहिले आहेत. त्यांनी २०१७ मध्ये भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर एक वर्षांनी त्यांनी पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम केले होते. यानंतर त्यांना पुन्हा एकदा महिला संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली.

https://twitter.com/theMPindex/status/1422073062162268167

महिला संघ या अगोदर टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये जर्मनीकडून २-० आणि ब्रिटनकडून ४-१ ने पराभूत झाला होता. पण आयर्लंडचा जर्मनीविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारताच्या महिलांना सुटकेचा नि: श्वास सोडला. आयर्लंडच्या पराभवाने भारतीय महिला संघाला उपांत्यपूर्व फेरीत जाण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा उचलत उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाने शानदार खेळ केला आणि उपांत्य फेरीचे तिकिटही पक्के केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

कौतुक तर होणारच! भारतीय हॉकी महिला संघाची ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनीही थोपटली पाठ

रोहित शर्माने ‘ती’ पोस्ट करत इंग्लंडला कसोटी मालिकेपूर्वी दिली वॉर्निंग?

सेमीफायनलसाठी भारताचे हॉकी संघ सज्ज; जाणून घ्या कधी आणि केव्हा होणार सामने

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---