---Advertisement---

एटीपी फायनल्स जिंकणारा स्टीफनोस सित्सिपास ग्रीसचा पहिला टेनिसपटू!

On: सोमवार, नोव्हेंबर 18, 2019 8:24 PM
---Advertisement---

रविवारी(17 नोव्हेंबर) पार पडलेल्या एटीपी फायनल्स (ATP Finals)  स्पर्धेत ग्रीसच्या स्टीफनोस सित्सिपासने(Stefanos Tsitsipas) अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमचा(Dominic Thiem) पराभव करत विजेतेपद पटकावले आहे. सित्सिपासने 6-7(6) 6-2 7-6(4) अशा फरकाने तीन सेटमध्ये थीमचा पराभव केला आणि या हंगामाचा शेवट गोड केला आहे.

या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा 21 वर्षीय सित्सिपास हा 2001 नंतरचा सर्वात युवा टेनिसपटू ठरला आहे. याआधी 2001मध्ये लिडन हेविट यांनी वयाच्या 20 व्या वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

तसेच या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा सित्सिपास हा ग्रीसचा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.

2 तास 35 मिनिटे चाललेल्या या अंतिम सामन्यात सित्सिपासला पहिला सेटमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. मात्र त्याने दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन करत हा सेट जिंकून सामन्यात बरोबरी साधली होती.

त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये थिम आणि सित्सिपास या दोघांमध्येही कडवी लढत पहायला मिळाली. पण अखेर हा सेट सित्सिपासने जिंकत सामनाही जिंकला.

https://twitter.com/atptour/status/1196169617644933120

सामना संपल्यानंतर सित्सिपास म्हणाला, ‘ही रोलरकोस्टर राईड होती. पण ट्रॉफी हातात घेतल्यानंतर खूप मस्त वाटत आहे.’ त्याचबरोबर सित्सिपासने सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचेही आभार मानले आहेत.

सित्सिपासने या स्पर्धेत उपांत्य फेरीत स्विझर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर थिमने जर्मनीच्या ऍलेक्झँडर झ्वेरेवला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---