जगभरात क्रिकेटचा वेगळाच चाहतावर्ग आहे. गेल्या काही वर्षांत क्रिकेटचा जगभरात झपाट्याने विकास झाला आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांबरोबरच जागतिक क्रिकेट स्पर्धा, टी२० लीग, द हंड्रेड, टी१० लीग, स्थानिक क्रिकेट स्पर्धा अशा वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामुळे क्रिकेटपटूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक मंच उपलब्ध होतो.
अशाच रॉयल लंडन वनडे कप २०२२ (Royal London ODI Cup) मध्ये इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज स्टिफन एस्किनाजिक (Stephen Eskinazi) याने त्याच्या कामगिरीने प्रभावित केले आहे. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या स्टिफनने चक्क शतकांची हॅट्रिक केली आहे.
स्टिफनने रॉयल लंडन वनडे चषकातील त्याचा पहिला सामना लिसेस्टरशायर संघाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने अर्धशतकी कामगिरी केली होती. स्टिफनने या सामन्यात ५१ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या होत्या. त्यानंतर डरहमविरुद्धच्या सामन्यात तर त्याच्या बॅटने आग ओकली. त्याने १३२ चेंडू खेळताना ४ षटकार व १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १४६ धावा फटकावल्या.
Stephen Eskinazi, record breaker 🎩
146*
182
135The first man to score 130+ in 3 consecutive List A innings 👏#RLC22 pic.twitter.com/MYor1SCrDn
— Metro Bank One Day Cup (@onedaycup) August 12, 2022
त्यानंतर सर्रे संघाविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी निघाली. त्याने सर्रेविरुद्ध तब्बल १८२ धावा चोपल्या. ६ खणखणीत षटकार आणि १७ शानदार चौकार मारत त्याने ही झंझावाती खेळी केली. पुढे नॉटिंघमशायरविरुद्धही त्याने १३५ धावा करत शतकांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. अशाप्रकारे सलग ३ वनडे सामन्यांमध्ये शतक झळकावण्याचा प्रशंसनीय विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे.
मिडलसेक्स संघाकडून खेळताना स्टिफनने ४ वनडे सामन्यात तब्बल ५१९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके आणि १ अर्धशतकही केले आहे. तो सध्या रॉयल वनडे चषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सध्या त्याची सरासरी १७३ आणि स्ट्राईक रेट १२२ इतका आहे. तर ओलिवियर रॉबिन्सन हा त्याच्यानंतरचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रॉबिन्सनने ४ सामन्यात ३०९ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आशिया चषक बेंचवर बसून घालवतील ‘हे’ दोन भारतीय खेळाडू! संघात आधीच दिग्गजांची भरमार
Best Catch | ‘या’ खेळाडूने घेतला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल, पाहा व्हिडिओ