भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत पहिल्याच दिवशी रंगात आली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत पोहोचवले. दोघांच्या नाबाद द्विशतकी भागीदारीने ऑस्ट्रेलिया सामन्यात ड्रायव्हिंग सीटवर पोहोचला आहे. आता या दोघांच्या नजरेच्या टप्प्यात तब्बल 99 वर्षांचा जुना विक्रम आहे.
भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात शानदार सुरुवात करताना ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे तीन फलंदाज लवकर बाद केले होते. 3 बाद 76 अशी स्थिती असताना स्मित व हेड ही जोडी मैदानावर जमले. हेडने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले. तर, स्मिथ याने संयम दाखवला. दरम्यान हेड याने आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी चौथ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केल्यानंतर स्मिथ याने देखील 50 धावांचा टप्पा पार केला. दुसरीकडे हेडने केवळ 106 चेंडूंवर विदेशातील आपले पहिले शतक झळकावले.
त्याने दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहत हेडने 156 चेंडूत 146 धावा केल्या. यामध्ये 22 चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. दुसरीकडे स्मिथने आपल्या शानदार संयमी खेळीत नाबाद 95 धावा केल्या. या दोघांच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 बाद 327 अशी पोहोचली.
या दोघांनी आतापर्यंत चौथ्या गड्यासाठी नाबाद 251 धावा केल्या आहेत. आता त्यांच्या टप्प्यात 99 वर्षांपूर्वीचा एक जुना विक्रम असेल. इंग्लंडमध्ये चौथ्या गड्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक मोठी भागीदारी डॉन ब्रॅडमन व बिल पॉन्सफोर्ड यांनी केली होती. 1924 मध्ये या जोडीने हेडिंग्ले येथे झालेल्या कसोटीत 388 धावा जोडल्या होत्या. हेड-स्मिथ जोडीला या धावसंख्येपर्यंत जाण्यासाठी अद्याप 138 धावांची गरज आहे.
या जोडीने हा विक्रम मोडल्यास भारतीय संघासाठी हा सामना जवळपास संपल्यात जमा होईल. कारण, ही भागीदारी मोठी झाल्यास ऑस्ट्रेलिया 500 पेक्षा जास्त धावा देखील करू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट