ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी फेब्रुवारीच्या सुरुवातीला तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बुधवारी (10 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाची गोषणा केली केली. या संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. सर्वात मोठा बदल म्हणजे स्टीव स्मिथ याच्या रुपात पाहायला मिळाला. अनुभवी स्मिथ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या वनडे कर्णधाराच्या रुपात खेळणार आहे.
वेस्ट इंडीज संघ सध्या दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी बुधवारी (10 जानेवारी) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपले संघ घोषित केले. यातील वनडे संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. वेस्ट इंडीजला पहिला कसोटी सामना 17 जानेवारीपासून खेळायचा असून कसोटी मालिकेचा शेवट 29 जानेवारी रोजी होईल. उभय संघांतील पहिला वनडे सामना 2 फेब्रुवारी रोजी मेलबर्नमध्ये आहे. या सामन्यात स्टीव स्मिथ (Steve Smith) पुन्हा एकदा कर्णधाराच्या रुपात दिसेल.
नियमित कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणारा पॅट कमिन्स (Pat Cummins) या वनडे मालिकेत विश्रांतीवर असेल. मागच्या काही महिन्यांपासून कमिन्सने विनाविश्रांती क्रिकेट खेळले आहे. याच कारणास्तव कर्णधाराला वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर वनडे मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत स्मिथ संघाचे नेतृत्व कशा पद्धतीने पार पाडतो, हे पाहण्यासारखे असेल.
Australia’s new Test opener…!!!
Steven Smith has batted at each position from No.3 to No.9, and now he’ll open the innings. pic.twitter.com/dNH4XeOES9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 10, 2024
या वनडे मालिकेसाठी संघात काही महत्वाच्या खेळाडूंना सामील करण्यात आले आहे. यात वेगवान गोलंदाज लांस मॉरिस, झाय रिचर्डसन, एरॉन हार्डी, मॅट शॉर्ट आणि नाथन एलिस यांचा समावेश आहे. मालिकेतील पहिला सामना मेलब्रनमध्ये खेळल्यानंतर उभय संघातील दुसारा आणि तिसरा सामना 4 आणि 6 फेब्रुवारी रोजी आयोजित केला गेला आहे.
The World Champs return to white-ball action in Feb!
Steve Smith will headline a squad packed with heroes from our recent triumph in India in a three-match series against @windiescricket. pic.twitter.com/HOtylKk7Ha
— Cricket Australia (@CricketAus) January 10, 2024
(Steve Smith became Australia’s captain for the ODI series against the West Indies)
वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ –
स्टीव स्मिथ, शॉन एबॉट, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, एरोन हार्डी, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिश, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, लांस मॉरिस, झाय रिचर्डसन, मॅट शॉर्ट, एडम झाम्पा.
महत्वाच्या बातम्या –
‘मी डेव्हिड वॉर्नरला महान खेळाडू मानत नाही,’ ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या प्रशिक्षकाचं धक्कादायक विधान
Ranji Trophy: रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक करणारे ‘5’ फलंदाज