---Advertisement---

…म्हणून सुपर ओव्हरमध्ये केएल राहुलसह विराट कोहली आला फलंदाजीला

On: शुक्रवार, जानेवारी 31, 2020 8:15 PM
---Advertisement---

वेलिंग्टन आज (31 जानेवारी) स्काय स्टेडियम (Sky Stadium) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात चौथा टी20 सामना (4th T20 Match) पार पडला. भारताने हा सामना सुपर ओव्हरमध्ये (Super Over) जिंकला. तसेच मालिकेत 4-0ने विजयी आघाडी घेतली. यावेळी सुपर ओव्हरमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) चौकार मारत भारताला सामना जिंकून दिला.

सामना झाल्यानंतर विराटने स्पष्ट केले की, केएल राहुलसह तो सुपर ओव्हर खेळायला का आला होता.

“मला माहिती होते की सॅमसन बेधडक फलंदाज आहे. त्यामुळे सलामीला सॅमसन आणि केएल राहुल चांगली फलंदाजी करू शकतात. सॅमसनकडे सामना जिंकवण्याची संधी होती. परंतु मी अधिक अनुभवी होतो आणि संघावर दबाव असताना माझ्यासाठी काही गोष्टी सांभाळणे महत्त्वाचे होते. त्यामुळे मी सॅमसनच्या अगोदर फलंदाजी करण्यासाठी गेलो,” असे सामन्यानंतर विराट म्हणाला.

“पहिल्या दोन चेंडूत मोठे फटके मारणे महत्त्वपूर्ण होते. तेव्हा मी विचार केला की, चेंडू माझ्या रेंजमध्ये आला तर मी सामन्याचा शेवट करेल. मी सुपर ओव्हरपासून बराच काळ दूर होतो. परंतु, मी माझ्या संघाला विजय मिळवून दिल्याने खूश आहे,” असेही विराट यावेळी म्हणाला.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम न्यूझीलंडने फलंदाजी केली. त्यांनी 1 बाद 13 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताला 14 धावांचे आव्हान होते. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुलने (KL Rahul) फलंदाजी केली. यावेळी भारताकडून केएल राहुलने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. तर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे भारताला शेवटच्या चार चेंडूत 4 धावांची गरज होती.

पण तिसऱ्या चेंडूवर राहुल बाद झाला. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या विराटने चौथ्या चेंडूवर 2 धावा काढल्या. तर पाचव्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना  प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 165 धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडनेही निर्धारित 20 षटकात 7 बाद 165 धावा केल्या. त्यामुळे या सामन्यात बरोबरी झाल्याने सुपर ओव्हर घेण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---