भारतीय क्रिकेट संघाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यावर उभय संघ 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही कसोटी मालिका महत्त्वाची आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ याने आपल्या फलंदाजी क्रमाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी सांगितले होते की, स्मिथने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कॅमेरून ग्रीनला दुखापत झाली नसती तरी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती. त्यामुळे आता हे निश्चित झाले आहे की स्मिथ भारताविरुद्ध सलामी देणार नाही. यानंतर अनुभवी फलंदाजाने भारताविरुद्ध सलामी न देता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याच्या निर्णयावर आपले मत मांडले आहे. यावेळी त्याने आपल्या दोन सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
कसोटी कर्णधार पॅट कमिन्स आणि प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्डने स्मिथला त्याच्या फलंदाजी क्रमाच्या निवडीबद्दल विचारले होते, ज्याला त्याने उत्तर दिले की मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे पसंती करेल. एनएसडब्ल्यूच्या शेफिल्ड शील्ड व्हिक्टोरिया विरुद्धच्या सामन्यादरम्यान याबाबत बोलताना स्मिथ म्हणाला, “मला विचारले गेले की मला कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे? आणि मी चौथ्या क्रमांकावर असे म्हणालो. मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार आहे, मला फारशी चिंता नाही, असेही मी म्हणालो.”
स्मिथ पुढे म्हणाला की, “मला विचारण्यात आले माझी निवड कोणती असेल आणि मी चौथ्या क्रमांकावर म्हणालो. मी गेल्या आठवड्यात काही गोष्टी पाहिल्या ज्यात असे म्हटले होते की मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची विनंती केली होती. मात्र तसे नव्हते. मी म्हणालो की तुम्ही मला जिथे फलंदाजी करायला सांगाल तिथे मी आनंदी आहे, पण हो, चौथा क्रमांक माझे आदर्श स्थान असेल.”
या वर्षाच्या सुरुवातीला स्मिथने संघ व्यवस्थापनाला त्याला सलामीला पाठवण्याची विनंती केली होती. आता त्याने हे देखील उघड केले की मार्नस लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा हे आपल्या वरच्या फळीत फलंदाजीच्या निर्णयावर खूश नव्हते. याबाबत बोलताना स्मिथ म्हणाला की, “साहजिकच ग्रीन बाहेर पडल्यानंतर आता एक जागा रिकामी आहे. न्यूझीलंड मालिकेनंतर आमच्यात झालेला संवाद. विशेषतः मार्नस आणि उझी (उस्मान ख्वाजा) सोबत. खरे सांगायचे तर, त्यांनी माझा तिरस्कार केला. मी त्यांच्या मागे फलंदाजी करावी अशी त्याची इच्छा होती. माझ्या पुनरागमनाचे हेही एक मोठे कारण आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
WTC FINALच्या बाहेर पडले ‘हे’ 4 संघ! उर्वरित सामने जिंकूनही नाही फायदा?
“बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफी खेळणार पण…” पुनरागमनाबद्दल मोहम्मद शमी काय म्हणाला?
IND vs NZ; दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा रचणार इतिहास? या दिग्गजाला टाकणार मागे