सर्वांना प्रतिक्षा असलेल्या ऐतिहासिक ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे सुरुवात झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे सुरुवात करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या १५ षटकांच्या आतच ऑस्ट्रेलियाला तीन झटके दिले. दरम्यान अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथची विकेट खूप खास आणि महत्त्वपुर्ण ठरली.
झाले असे की, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने सलामी फलंदाजी जोडी जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड यांना फलंदाजीसाठी मैदानावर पाठवले. परंतु भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकातच जो बर्न्सला शून्यावर पव्हेलियनला रवाना केले. त्यानंतर अवघ्या ३० धावांवर मॅथ्यू वेडही झेलबाद झाला.
पुजाराने वेगाने डाइव्ह मारत पकडला झेल
त्यामुळे मार्नस लॅब्यूशाने आणि स्मिथ फलंदाजीसाठी आले. पण भारतीय गोलंदाजांपुढे स्मिथची फलंदाजी अर्धा तासही टिकू शकली नाही. स्मिथ फलंदाजीला आल्यानंतर पहिल्या षटकात बुमराहने त्याला एकही धाव करु दिली नाही. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने अश्विनकडे डावातील १५वे षटक सोपवले. अश्विनच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्मिथने जोरदार बॅट फिरवत लेग स्लिपकडे शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेतेश्वर पुजारा आधीपासूनच त्या ठिकाणी सावध उभा होता आणि त्याने चेंडू आपल्याकडे येत असल्याचे पाहून गोल उडी घेत पटकन झेल पडकला.
https://twitter.com/realgattsby/status/1342644753066684416?s=20
https://twitter.com/ChrisHBhinder_/status/1342633186602442752?s=20
अशाप्रकारे भारतीय संघाला स्मिथच्या रुपात तिसरी विकेट मिळाली. पुजाराने पकडलेल्या या अप्रतिम झेलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातही स्मिथ एकही धाव न करता म्हणजे शून्यावर झेलबाद झाल्यामुळे अश्विन आणि पुजारावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : पहिल्या सत्रात अश्विन चमकला, ऑस्ट्रेलियाच्या २७ षटकात ३ बाद ६५ धावा
जड्डूची कमाल! मॅथ्यू वेडचा घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ
‘बॉक्सिंग डे’ कसोटी: भल्याभल्या दिग्गजांना न जमलेल्या विक्रमाची रॉस टेलरच्या नावे नोंद, ठरला पहिलाच