---Advertisement---

स्टीव स्मिथ तीन महिन्यात खेळणार तिसरी मोठी क्रिकेट लीग

---Advertisement---

आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आगामी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेेळणार आहे. त्याच्यासोबत दक्षिण अफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डीव्हीलिर्स देखील या स्पर्धेत खेळणार आहे.

डीव्हीलिर्स, ख्रिस गेल, ब्रेडन मॅकलम, ड्वेन ब्रॅवो, किराॅन पोलार्ड, शेन वाॅटसन आणि ख्रिस लिन या सारखे दिग्गज ही स्पर्धा खेळणार असल्याचे आधीच जाहिर झाले आहे. या दिग्गज खेळाडूंमुळे या स्पर्धेची रंगत वाढणार आहे.

त्यात आता स्मिथचा समावेश होणार आहे. स्मिथने आपले नाव या स्पर्धेसाठी सुचविल्याचा खुलासा  गुरुवारी (4 आॅक्टोबर) पाकिस्तानातील काही मोठ्या क्रिकेटच्या पत्रकारांनी हा केला आहे.

आॅस्ट्रेलिया संघाचा सध्या प्रतिबंधीत असलेला सलामीवीर डेव्हीड वाॅर्नर देखील या स्पर्धेत खेळणारा मोठा खेळाडू असू शकतो असे वृत्त आहे.

दक्षिण अफ्रिकीविरूद्धच्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्या प्रकरणी  क्रिकेट आॅस्ट्रेलियाने स्मिथ आणि वाॅर्नर या दोघांवरही एक वर्षाची बंदी घातली होती.

त्याआधी त्याने कॅनडातील ग्लोबल टी-20 लीग स्पर्धेत टोरोंटो संघाकडून खेळला होता तसेच बार्बाडोस ट्रायडेंटकडून तो कॅरिबीयन प्रीमियर लीग खेळला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment