आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहे.
तसेच आॅस्ट्रेलिया संघाने भारताच्या फलंदाजांचा सराव करण्यासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणी एक वर्षाची बंदी घातलेले डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथची मदत घेतली आहे.
या दोघांनीही आॅस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध नेटमध्ये फलंदाजी करुन गोलंदाजांना सराव दिला आहे. त्याचे व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत.
Whoops! Steve Smith didn’t have it all his own way against Australia’s Test quicks at the SCG, but he also peeled off some trademark shots. WATCH: https://t.co/TqBm1vvBKt pic.twitter.com/lAxNdVpdRx
— cricket.com.au (@cricketcomau) November 27, 2018
Two of Australia's star quicks didn't hold back when David Warner jumped in the SCG nets this afternoon. pic.twitter.com/yyoUowozWP
— cricket.com.au (@cricketcomau) November 25, 2018
या सरावादरम्यान स्मिथ पुलचा फटका खेळताना एकदा खालीही पडला. पण त्यानंतर त्याने लगेचच उठून पुन्हा खेळायला सुरुवात केली. तसेच तो त्याच्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करतानाही दिसला आहे.
तसेच स्मिथ आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगरसह हाॅटेलमध्ये ब्रेकफास्ट करतानाचा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
7 News Exclusive: Banned cricket captain @stevesmith49 in secret talks with coach Justin Langer. Pictures on @Channel7 at 6pm. @7cricket #7cricket #7News pic.twitter.com/xu5hC7H9nP
— 7NEWS Sydney (@7NewsSydney) November 26, 2018
मार्चमध्ये झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने एक वर्षाची तर कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्याची बंदी घातली आहे. मात्र ही बंदी आता उठवावी अशी मागणी होत होती. पण क्रिकेट आॅस्ट्रेलियाने मागील आठवड्यात ही बंदी उठवण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे त्या तिन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी बंदीचा कालावधी पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–विकेटकीपर म्हणून पार्थिवच हवा, रिषभ पंत नकोच
–बंदी घातेलला स्टिव स्मिथ खेळणार चौथ्याच संघाकडून
–किंग्स इलेव्हन पंजाबमध्येही स्थान न मिळालेल्या युवराजला या संघाने दिला सहारा