भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला गुरुवारपासून ( 9 मार्च) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 4 बाद 255 अशी मजल मारली. सलामीवीर उस्मान ख्वाजा याने नाबाद शतक साजरे करत सर्वाधिक योगदान दिले. मात्र, संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात चांगली सुरुवात केली. हेड व ख्वाजा या जोडीने 61 धावांची सलामी दिली. तिसऱ्या क्रमांकावरील लॅब्युशेन केवळ दोन धावा करू शकला. त्यानंतर ख्वाजा व कर्णधार स्मिथ ही जोडी जमली. त्यांनी दुसऱ्या सत्रात भारतीय संघाला एकही यश मिळू दिले नाही. त्यांनी 79 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या सत्रानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 149 अशी होती. मात्र, अखेरच्या सत्रात जडेजाने पहिल्यांदा स्मिथ याला बाद करण्यात यश मिळवले. त्याने 38 धावा केल्या. जडेजाने त्याचा त्रिफळा उडवला. ही त्याची या मालिकेतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
स्मिथ याच्याकडून ऑस्ट्रेलिया संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. नागपूर येथील पहिल्या कसोटीत त्याने 37 व नाबाद 25 धावा केल्या. दिल्ली कसोटीत तो दोन्ही डावात मिळून दहा धावाही करू शकला नाही. पहिल्या डावात शून्य तर दुसऱ्या डावात नऊ धावा त्याने केल्या होत्या. इंदोर कसोटीच्या पहिल्या डावातही तो केवळ 26 धावांचे योगदान देऊ शकला. या मालिकेत त्याला वारंवार चांगली सुरुवात मिळाली आहे. मात्र, मोठी धावसंख्या उभारण्यात त्याला अपयश येतेय.
यासोबतच त्याच्या कसोटी कारकिर्दीत असे प्रथमच घडत आहे की, सलग सहा डावांमध्ये तो एकदाही अर्धशतक झळकावू शकला नाही. त्यामुळे या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याच्याकडे मोठी खेळी करण्याची अखेरची संधी असेल.
(Steve Smith Fail Again In Border-Gavaskar Trophy 2023 After Fine Start)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून स्मिथ जेव्हाजेव्हा भारतात आला तेव्हा नडलाय, पाहा ही जबरदस्त आकडेवारी
‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video