---Advertisement---

आणि स्टिव्ह स्मिथने दिले मॅक्सवेलला चोख उत्तर !

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एका व्हिडिओ गेमच्या शूटिंगच्या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या आणि बाकी खेळाडूंच्या नकला केल्या होत्या. या बद्दलचा एक ट्विट क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेयर केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथची ही नक्कल केली होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड क्रिकेट आणि मेलबर्न स्टुडिओ बिग एकत्रित येऊन हा व्हिडिओ गेम बनवत आहेत. त्याच व्हिडिओला प्रतिउत्तर म्हणून स्टिव्ह स्मिथने ही त्याच व्हिडिओ गेमसाठी शूट करताना एक व्हिडिओ काढला आहे ज्यात त्याने ग्लेन मॅक्सवेलची नक्कल केली आहे आणि यात मॅक्सवेलला खेळता न आलेल्या एका फटक्याची नक्कल केली आहे.

बिग बॅश लीगमधील एका सामन्यात मॅक्सवेल फलंदाजी करत असताना त्याने एक चेंडू न खेळता सोडून देण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडू जाऊन थेट स्टॅम्प्सला लागला आणि तो क्लीन बोल्ड झाला. हा त्याचा व्हिडिओ तेव्हा सोशल मीडियावर खूप चर्चित झाला होता.

त्याच न खेळलेल्या फटाक्याची नक्कल कर्णधार स्मिथने करून दाखवली आहे आणि मॅक्सवेलच्या त्या व्हिडिओला चोख प्रतिउत्तर दिले.

पहा कर्णधार स्टिव्ह स्मिथने कसे दाखूवन दिले की खरा बॉस कोण आहे !

पहा कशी केली होती मॅक्सवेलने स्टिव्ह स्मिथची नक्कला !

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment