मेलबर्नमधील ‘बॉर्डर गावसकर ट्रॉफी’च्या (Border Gavaskar Trophy) चौथ्या कसोटी सामन्यात ‘सॅम कॉन्स्टास’ने (Sam Konstas) भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाकडून संस्मरणीय पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाने चौथी कसोटी 184 धावांनी जिंकली. काॅन्स्टासचा पदार्पण सामना वादांनी भरलेला होता. त्याने फक्त एकच नाही तर अनेक भारतीय खेळाडूंचा सामना केला. विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जयस्वाल यांच्याशी तो वेगवेगळ्या प्रसंगी भांडत राहिला.
भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) जवळच क्षेत्ररक्षण करत होता. तो जयस्वालला सतत त्रास देत होता. कॉन्स्टास काही ना काही बोलत होता. तो भारतीय फलंदाजाला सतत त्रास देत होता. यामुळे चिडून यशस्वीने अंपायरकडे तक्रार केली. आता या प्रकरणावर ‘स्टीव्ह स्मिथ’ने (Steve Smith) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जयस्वालवर आरोप करताना तो म्हणाला की, भारतीय फलंदाजाला कॉन्स्टासला मारायचे होते.
स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) म्हणाला, “तो (कॉन्स्टास) किलबिलाट करत होता. मला वाटते की एकेकाळी यशस्वी जयस्वाल त्याला शांत करण्यासाठी त्याच्यावर चेंडू मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु कॉन्स्टासने संघात खूप ऊर्जा आणली आहे. त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला एवढी चांगली सुरूवात करताना पाहून खूप आनंद झाला आणि मला वाटते की त्याचे भविष्य उज्ज्वल आहे.”
बाॅर्डर-गावसकर मालिकेबद्दल बोलायचे झाले, तर यातील पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत अॅडलेड कसोटीत विजय मिळवला. दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना ड्राॅ राहिला. चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवत, मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली. आता दोन्ही संघातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ (3 ते 7 जानेवारी) दरम्यान आमने-सामने असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
जसप्रीत बुमराह सिडनीत इतिहास रचणार? हरभजन सिंगचा हा महान विक्रम मोडण्याची शक्यता
एमएस धोनीने गोव्यात साजरे केले नवीन वर्ष, पाहा VIDEO
ind vs aus; टीम इंडियात सर्व काही ठीक नाही, कोच गंभीरच्या बोलण्याकडे खेळाडूंचा दुर्लक्ष?