इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा ऍशेस सामना चांगलाच रंगात आहे. लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात दोन्ही संघ एकापेक्षा एक प्रदर्शन करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ याच्यासाठी कसोटी कारकिर्दीतील हा 100वा सामना आहे. या खास सामन्यात स्मिथ पहिल्या डावात मोठी खेळी करू शकला नाही. पण श्रेत्ररक्षण करताना त्याने एक मोठा विक्रम मोडीत काढला.
आपल्या 100व्या कसोटी सामन्यात स्टीव स्मिथ (Steve Smith) मोठी खेळी करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 31 चेंडूत 22 धावा करून विकेट गमावली. स्मिथला पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नाही. पण श्रेत्ररक्षण करताना त्याने शानदार प्रदर्शन केले. स्मिथने हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात एक-दोन नाही तर तब्बल पाच झेल पकडले. या कामगिरीच्या जोरावर स्मिथने माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज ऍलन बॉर्डर (Allan Border) यांचा विक्रम मोडीत निघाला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघासाठी सर्वाधिक झेल पकडणाऱ्यांमध्ये स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून बॉर्डर चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. यातील पहिला क्रमांक माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याचा आहे. पाँटिंगने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 363 झेल पकडले आहेत. कारकिर्दीत 289 झेल घेणारे मार्क वॉ (Mark Waugh) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू –
363 – रिकी पाँटिंग
289 – मार्क वॉ
284* – स्टीव स्मिथ
283 – ऍलन बॉर्डर
उभय संगांतील या कसोटी सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 60.4 षटकांमध्ये 263 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरत इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 237 धावांवर गुंडालळा गेला. इंग्लंडसाठी मार्क वुड (5 विकेट्स), तर ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्स (6 विकेट्स) यांनी कमाल प्रदर्शन केले. फलंदाजंमध्ये ऑस्ट्रेलियासाठी मिचेल मार्श (118) शतक केले, तर प्रत्युत्तरात इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स याने 80 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियन संघाला 26 धावांची आघाडी मिळाली. (Steve Smith has reached the third highest number of catches for Australia)
महत्वाच्या बातम्या –
विकेट्सचं पंचक! हेडिंग्ले कसोटीत पॅट कमिन्सने उडवला इंग्लिश फलंदाजांचा धुव्वा
बॉल फेकतोय की भाला! तिसऱ्या Ashes कसोटीत मार्क वूडने केला रेकॉर्ड, माजी कर्णधारही झाला फिदा