सिडनी क्रिकेट ग्राउंडवर गुरुवारपासून (७ जानेवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३३८ धावा केल्या आहेत. या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने शतक पूर्ण करत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्मिथने २२६ चेंडूचा सामना करत नाबाद १३१ धावांची खेळी केली आहे. दरम्यान त्याने १६ चौकारही ठोकले आहेत. भारताविरुद्ध कसोटी सामन्यात स्मिथने केलेले हे आठवे शतक होते. यापुर्वी घरच्या मैदानावर भारतीय संघाविरुद्ध त्याने ४ शतके केली होती. तर भारतातील मैदानावर ३ शतकांची नोंद केली होती.
विशेष म्हणजे, यासह स्मिथने भारताविरुद्ध सर्वात कमी डावात सर्वाधिक ८ शतके करण्याचा मोठा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. अवघ्या २५ डावात स्मिथने हा किर्तिमान मिळवला आहे.
स्मिथपुर्वी गॅरी सोबर्स, व्हिव्हियन रिचर्ड्स आणि रिकी पाँटिंग यांनी भारताविरुद्ध प्रत्येकी ८ शतके झळकावण्याचा विक्रम केला होता. मात्र त्यांना हा विक्रम करण्यासाठी ३० किंवा त्यापेक्षा जास्त डाव लागले होते. भारताविरुद्ध ८ शतक करण्यासाठी सोबर्स यांना ३० डाव, रिचर्ड्स यांना ४१ डाव आणि पाँटिंगला तब्बल ५१ डाव खेळावे लागले होते.
स्मिथने भारतीय संघाविरुद्ध कसोटीत केलेली शतके-
नाबाद १६२ धावा- ऍडलेड
१३३ धावा- ब्रिसबेन
१९२ धावा- मेलबर्न
११७ धावा- सिडनी
१०९ धावा- पुणे
नाबाद १७८ धावा- रांची
१११ धावा- धरमशाला
नाबाद १०१ धावा- सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : स्टिव्ह स्मिथचे शतक पूर्ण, ऑस्ट्रेलियाच्या ९८ षटकात ७ बाद २९१ धावा
भारीच ना भावा! हवेत उंच उडी घेत ‘त्याने’ एका हाताने अडवला सिक्सर, व्हिडिओ तूफान व्हायरल
बुमराहने स्मिथची केलेली नक्कल पाहून सिराजला आवरले नाही हसू, पाहा व्हिडिओ