आयपीएलचे १४ वा हंगाम येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. स्पर्धेचे आयोजन भारतात होणार की नाही यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. याच पार्शवभूमीवर १८ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव देखील करण्यात आला होता. या लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने ख्रिस मॉरिसला १६.२५ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट केले आहे.तसेच तो आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू देखील बनला आहे. या लिलावात स्टिव्ह स्मिथला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले आहे. त्यानंतर त्याने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधाराची भूमिका बजावलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथला राजस्थान रॉयल्स संघाने लिलावापूर्वी मुक्त केले होते. त्यांनतर आयपीएल २०२१ च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने २.२ कोटी रुपये खर्च करत खरेदी केले आहे.
यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये स्मिथने म्हटले की, “मी खरंच, या वर्षी या संघासोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे. या संघात उत्कृष्ट खेळाडू आहेत. तसेच प्रशिक्षक म्हणून रिकी पाँटिंग आहेत. मी संघासोबत खेळण्यास आणि काही सुखद आठवणी निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे. मला अपेक्षा आहे की, संघाने केलेल्या मागच्या वर्षीच्या कामगिरीपेक्षा आणखी चांगली कामगिरी करण्यास मी मदत करेल.”
"̶W̶h̶e̶n̶ ̶w̶i̶l̶l̶ ̶S̶t̶e̶v̶e̶ ̶S̶m̶i̶t̶h̶ ̶s̶h̶a̶r̶e̶ ̶a̶ ̶m̶e̶s̶s̶a̶g̶e̶ ̶f̶o̶r̶ ̶D̶C̶ ̶f̶a̶n̶s̶?̶"̶ #YehHaiNayiDilli #IPL2021 @stevesmith49 pic.twitter.com/jYCoNtn7H7
— Delhi Capitals (@DelhiCapitals) February 23, 2021
दिल्ली संघाकडे मजबूत फलंदाजी क्रम
दिल्ली संघाने मागील वर्षी उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु, अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स संघाने त्यांना पराभूत केले होते. दिल्ली संघाकडे मजबूत आणि आक्रमक फलंदाज आहेत. यात भारतीय संघाचे रिषभ पंत, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर आहेत तर, परदेशी खेळाडूंमध्ये शिमरोन हेटमायर आणि मार्कस स्टोइनिस यांसारख्या परदेशी फलंदाजांचा समावेश होता. तसेच स्टीव्ह स्मिथच्या येण्यामुळे दिल्ली संघाची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.
आयपीएल २०२१ साठी दिल्ली कॅपिटल्स संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, रिषभ पंत, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, डॅनियल्स सॅम्स , एन्रिच नॉर्किए, ख्रिस वोक्स, प्रविण दुबे.
लिलावात खरेदी केलेले खेळाडू –
टॉम करन(५.२५ कोटी), स्टिवन स्मिथ(२.२० कोटी), सॅम बिलिंग्ज(२ कोटी), उमेश यादव(१ कोटी), रिपाल पटेल(२० लाख), विष्णू विनोद(२० लाख), लुकमन हुसेन मेरिवाला(२० लाख), एम सिद्धार्थ(२० लाख)
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार श्रेयस अय्यरचे शतक; मुंबईने महाराष्ट्रावर मिळवला दणदणीत विजय
शंभरावा सामना खेळणाऱ्या इशांत शर्माचे टीम इंडियाने ‘असे’ केले मैदानात स्वागत, पाहा व्हिडिओ
भारतीय महिला संघ मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज; ‘या’ संघाविरुद्ध मायदेशात खेळणार मालिका