भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघ 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकमेकांचा सामना करणार आहेत. मालिकेतील पहिल्या नागपूर कसोटीला (Nagpur Test) सुरुवात होण्यापूर्वीच या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून सातत्याने शाब्दिक दावे केले जात आहोत. ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने या मालिकेत मागील मालिकेसारखीच कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियन संघाला या दौऱ्यावर स्मिथ त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण, तो संघातील सर्वात अनुभवी फलंदाज असून, त्याची भारतातील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने मागील वेळी 2017 मध्ये कसोटी मालिकेसाठी भारत दौरा केलेला. त्यावेळेस स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार होता. ऑस्ट्रेलियन संघाला त्या मालिकेत 2-1 असा पराभव पत्करावा लागलेला. मात्र, स्वतः स्मिथने पुणे येथील सामन्यात शतक झळकावण्यासोबतच 499 धावा केलेल्या. त्यानंतर आता पाच वर्षानंतर पुन्हा एकदा त्याला तशीच कामगिरी करण्याचा विश्वास आहे.
पहिल्या सामन्याआधी बोलताना तो म्हणाला,
“यावेळी भारतात मालिका जिंकण्याचे आव्हान घेऊनच आम्ही येथे आलो आहोत. मी स्वतः या मालिकेसाठी एकदम तयार आहे. 2017 मध्ये जशाप्रकारचा फॉर्म होता अगदी तशीच कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहील.”
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक-
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारीदरम्यान नागपूर येथे पार पडले. त्यानंतर दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान पार पडेल. याव्यतिरिक्त तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया संघ धरमशाला येथे 1 ते 5 मार्चदरम्यान भिडतील. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथे 9 ते 13 मार्चदरम्यान पार पडेल.
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कशी नशिबानं थट्टा आज मांडली! अनबॉक्सिंग करण्यापूर्वीच गमावला विराटचा नवा कोरा फोन, चाहत्यांकडे मागितली मदत
राहुलने पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनची माहिती केली लीक! ताबडतोब घ्या जाणून