संपूर्ण जग सध्या कोविड-१९ या जागतिक महामारीचा सामना करत आहे. अशात गेल्या २-३ महिन्यांपासून ठप्प पडलेले क्रिकेट क्षेत्र पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न चालू आहेत. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकामुळे आयपीएलच्या १३व्या हंगामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
अनेकांचे म्हणणे आहे की, टी२० विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय योग्य आहे. त्याऐवजी आयपीएल झाले पाहिजे. याला समर्थन देत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमुळे टी२० विश्वचषक स्थगित झाल्यास तो आयपीएल खेळण्यास तयार आहे.
आयपीएल फ्रंचायझी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्मिथ म्हणाला की, “जर ऑस्ट्रेलिया सरकारने परवानगी दिली, तर तो आयपीएल खेळण्यासाठी भारतात जाण्यास तयार आहे. देशासाठी विश्वचषक खेळणे खूप महत्त्वाचे आहे. मी निश्चितपणे विश्वचषकाला प्राधान्य देईन. पण, जर ते स्थगित करण्यात आले आणि आयपीएल झाले. तर मी आयपीएल खेळण्यास तयार आहे.”
“परिस्थिती सध्या आपल्या हाताबाहेर आहे. आम्ही तेच करत आहोत, जे आम्हाला करण्यास सांगितले जात आहे. अशा बातम्या ऐकायला मिळत होत्या की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयसीसीला टी२० विश्वचषक २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यास सांगितले आहे. तरी, अंतिम निर्णय हा १० जूनला आयसीसीच्या बैठकीत होईल.”
“मी याविषयी अजून जास्त विचार केलेला नाही. आम्ही व्यावसायिक आणि सरकारच्या सल्ल्याचे पालन करू. आता देशात जी परिस्थिती आहे, त्यानुसार क्रिकेट घेणे उचित नाही. जेव्हा योग्य वेळ येईल आणि आम्हाला सांगितले जाईल तेव्हाच आम्ही पुनरागमन करु. तेव्हापर्यंत शारिरिक आणि मानसिकरित्या मजबूत राहण्याची नितांत गरज आहे,” असे पुढे बोलताना स्मिथ म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
हार्दिक पंड्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल माहित नसलेल्या ‘या’ ५ गोष्टी
पब्जी खेळण्याचे परिणाम असे भोगतोय कॅप्टन कूल धोनी, रोज करतोय…
क्रिकेटर पतीला ‘फ्लाॅप’ म्हणून संबोधल्याने टीम इंडियाच्या…