fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पब्जी खेळण्याचे परिणाम असे भोगतोय कॅप्टन कूल धोनी, रोज करतोय…

Sakshi Said The Advantage Of Dhoni's Recent Habit Of Playing PUBG

गेल्या २-३ महिन्यांपासून कोविड-१९ मुळे भारत देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच घरात एवढा वेळ घालवणारे क्रिकेटपटू सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाले आहेत. इंस्टाग्राम लाइव्हवरुन अनेक क्रिकेटपटूंना चांहत्यांशी संवाद साधताना आपण पाहिले आहे. मात्र, चक्क कॅप्टनकूलची पत्नी साक्षी धोनी नुकतीच लाइव्ह आली होती.

चेन्नई सुपर किंग्सच्या इंस्टाग्राम पेजवरुन लाइव्ह आलेल्या साक्षीने धोनी पब्जी खेळण्यात व्यस्त असल्याचे सांगितले आहे. शिवाय यामुळे त्याला कसा फायदा होतो, याविषयीही ती बोलली आहे.

साक्षी म्हणाली की, “धोनी पब्जी गेमसाठी खूप उत्सुक दिसून येतो. त्याला नेहमी विचार करत राहण्याची सवय आहे आणि तो जास्त आरामही करत नाही. अशात त्याला येणारा ताण कमी करण्यासाठी या व्हिडिओची गेमची खूप मदत होते.”

साक्षी म्हणाली, “धोनी बेडरुममध्ये पब्जी खेळत असतो. पण याचा मला अजिबात राग येत नाही. तो खेळण्यात इतका व्यस्त असतो की, मलाही बोलत नाही. मात्र, मधेच तो गेम सोडून हेडफोन लावून कॉलवर बोलत बसतो. तो पब्जीमध्ये इतका व्यस्त होतो की, तो रात्री झोपेतही पब्जीविषयीच बोलत असतो.”

शिवाय २०१८मधील चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाबाबत बोलत साक्षी म्हणाली की, “सीएसके  एका कुटुंबाप्रमाणे आहे. २०१८मध्ये सीएसकेचे आयपीएलमध्ये झालेले पुनरागमन हा धोनीसाठी खूप भावानात्मक क्षण होता. त्यामुळे तो सामना सुरु होण्यापुर्वी डिनरमध्ये रडला होता.”

२०१६मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्सवर २ वर्षांची बंदी घालण्यात होती. त्यानंतर २०१८मद्ये पुनरागमन करत सीएसकेने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.

ट्रेंडिंग घडामोडी-

…म्हणून सौरव गांगुलीची इच्छा नव्हती की मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध…

धोनीने तेव्हा भर पत्रकार परिषदेत माझ्या कामगिरीवर केले होते…

असा कर्णधार, ज्याने काही वर्षांपूर्वीच केली होती आपल्या मृत्यूची भविष्यवाणी

You might also like