कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी क्रिकेटपटूंनी त्यांचा मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. अशात लाइव्ह चॅटच्या मदतीने खेळाडू चाहत्यांशी संवाद साधत आहेत. परंतु या गोष्टीचा सर्वात मोठा फायदा हा होत आहे की, हळूहळू प्रत्येक क्रिकेटपटूविषयी छोट-छोट्या गोष्टींचा उलगडा होत आहे.
असाच एक उलगडा भारताच्या माजी वेगवान गोलंदाज इरफान पठानने केला आहे. यावेळी बोलताना त्याने आपल्या कसोटी पदार्पणाशी संबंधित सौरव गांगुलीबाबतचा एक मजेदार किस्सा सांगितला आहे. एका यूट्यूब चॅनलवरील लाइव्ह चॅटमध्ये बोलताना इरफान म्हणाला की, “डिसेंबर २००३मध्ये मी माझे कसोटी पदार्पण केले होते. पण त्यावेळी कर्णधार गांगुलीची इच्छा नव्हती की माझी भारतीय संघात निवड व्हावी.” Irfan Pathan Reveals About His Test Debut & Sourav Ganguly
“गांगुलीचे म्हणणे होते की, त्यावेळचा ऑस्ट्रेलिया संघ खूप मजबूत मानला जात होता आणि अशा मजबूत संघाविरुद्ध माझे पदार्पण होऊ नये. कारण, त्यावेळी मी जवळपास १९ वर्षांचा होतो आणि एवढ्या कमी वयात एवढ्या मजबूत संघाविरुद्ध मी पदार्पण केल्यास, माझी सुरुवात खराब होईल. याविषयी स्वत: गांगुलीने मला सांगितले होते,” असे इरफान पुढे म्हणाला.
असे असले तरी, इरफानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी पदार्पणाच्या मालिकेत शानदार कामगिरी केली होती. त्याने संपूर्ण मालिकेत ४ विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये मॅथ्यू हेडन आणि ऍडम गिलख्रिस्ट अशा दिग्गजांच्या विकेटचा समावेश होता.
भारतीय संघातील आपल्या पदार्पणासाठी गांगुलीला धन्यवाद देत इरफान म्हणाला की, “गांगुली हा एक चांगला निवडकर्ता होता. तो चांगला कर्णधारही होता. तो नेहमी संघातील खेळाडूंचे समर्थन करत असायचा. याच कारणामुळे त्याला भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते.”
इरफानने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २९ सामने खेळत ११०५ धावा केल्या होत्या. यात त्याच्या एका शतकाचा आणि ६ अर्धशतकांचा समावेस होता. तसेच, १०० विकेट्सही घेतल्या होत्या. यात त्याच्या ५९ धावा देत ७ विकेट्सच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
हार्दिक पंड्या होणार बाबा! पत्नी नताशाच्या एक्स बॉयफ्रेंडने दिली अशी…
टीम इंडियाचा शिलेदार म्हणतो; ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाला स्लेजिंग, नको…