नवी दिल्ली । भारतात क्रिकेटमधील एक अँकर म्हणून मयंती लँगरने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ खेळाडूच नव्हे तर चाहतेेदेखील मयंतीला ओळखतात. भारतात मयंतीला जे स्थान आहे, असेच काहीसे स्थान पाकिस्तानमधील महिला क्रीडा पत्रकार झैनब अब्बासला आहे.
झैनबने (Zainab Abbas) खुलासा केला, की आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. कारण क्रिकेटपटू ती महिला असल्या कारणामुळं तिच्याशी चर्चा करत नव्हते.
क्रिकेटपटूंना महिला पत्रकाराशी चर्चा करायची नव्हती
“पाकिस्तानमध्ये एक क्रीडा पत्रकार होणे खूप आव्हानात्मक आहे. सुरुवातीला क्रिकेटपटू माझ्याबरोबर काम करत नव्हते. कारण मी एक महिला आहे म्हणून. धर्माला मानणारे खेळाडू माझ्याबरोबर स्क्रीन शेअर करत नव्हते,” असे वुमन क्रिक झोनच्या एका पॉडकास्टमध्ये झैनबने सांगितले.
“आता हळू-हळू खेळाडू बदलत आहेत. कारण आता मी खूप काळापासून काम करत आहे. त्यांना माहित आहे की मी केवळ आपले काम करत आहे,” असेही झैनब पुढे म्हणाली.
मयंतीप्रमाणे (Mayanti Langer) झैनबदेखील क्रिकेटशी जोडलेली आहे. तिने पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री शाहिद हाफिजचा मुलगा हमजा कारदारशी लग्न केले आहे. हाफिज यांचे वडील पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार अब्दुल हाफिज कारदार आहेत.
जगभरात नाव कमाविले
झैनबचा समावेश त्या महिला क्रीडा पत्रकारांमध्ये होतो, ज्यांंनी आपल्या कामाने मोठे नाव कमावले आहे. तिने मागील वर्षी झालेल्या विश्वचषकापासून पाकिस्तान सुपर लीगपर्यंत सर्व गोष्टी कव्हर केल्या आहेत. विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा कव्हर करणारी ती पाकिस्तानची पहिली महिला क्रीडा पत्रकार होती. यापूर्वी तिने ‘सवाल क्रिकेट का’ आणि ‘क्रिकेट दिवानगी’ या नावाचे क्रिकेट कार्यक्रमदेखील आयोजित केले आहेत.
या पॉडकास्टदरम्यान तिने हेदेखील सांगितले, की जर तिला कोणत्या खेळाडूबरोबर क्वारंटाईन व्हायचे असेल, तर तो खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) असेल. याचे कारण सांगत ती म्हणाली, “तो खूप मनोरंजन करतो. मी त्याच्यासोबत असेल, तेव्हा मला कंटाळा येणार नाही.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-फक्त १ सामना नीट खेळले नाही आणि आयपीएलचे कायमचे उपविजेते झालेले ५ संघ
-ज्या सामन्यात विकेटकीपर होते, त्याच सामन्यात विकेट्स घेणारे ३ खेळाडू
-कारकिर्दीतील पहिलाच टी२० सामना गाजवणारे ३ फलंदाज, एक आहे माजी कर्णधार





