fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

हार्दिक पंड्या होणार बाबा! पत्नी नताशाच्या एक्स बॉयफ्रेंडने दिली अशी प्रतिक्रिया…

Ex Boyfriend Aly Goni Congratulates Natasa Stankovic and Hardik Pandya

नवी दिल्ली । भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या लवकरच बाबा होणार आहे. त्याने रविवारी (३१ मे) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तो आणि त्याची पत्नी नताशा आई- वडील होणार असल्याची माहिती दिली होती. त्याने नताशाच्या बेबी शॉवरचे फोटोही शेअर केले आहेत.

पंड्याच्या या घोषणेनंतर या दांपत्यांवर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यादरम्यान नताशाचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनीनेही (Aly Goni) शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने दिल असणाऱ्या ईमोजीचा वापर करत कमेंटमध्ये लिहिले, “भगवंताचा आशीर्वाद तुमच्यावर राहो.”

पंड्याने (Hardik Pandya) आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी आनंदाची बातमी देत या वर्षाची सुरवात केली होती. त्याने नव्या वर्षी फिल्मी स्टाईलमध्ये नताशाबरोबर (Natasa Stankovic) समुद्रामध्ये बोटीत साखरपुडा केला होता. पंड्याने नताशाच्या बेबी बंपसह एक फोटो शेअर केला होता, ते पाहून असे म्हटले जात आहे की त्याने नताशाबरोबर लग्न केले आहे. तरी त्याने फोटो शेअर करत त्याचा उल्लेख केला नाही, की त्यांनी लग्न केले आहे की नाही.

परंतु दुसऱ्या एका फोटोत पंड्या आणि नताशा एकमेकांच्या गळ्यात हार घालताना दिसत आहेत. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) पंड्या नताशाबरोबर घरात वेळ घालवत आहे.

खास अंदाजात केले होते प्रपोज

पंड्याने नवीन वर्षी खास अंदाजात नताशाला प्रपोज केले होते. त्याने गुडघ्यावर बसत अंगठी घालून नताशाला प्रपोज केले होते. नताशानेही प्रत्युत्तर देत त्याचे प्रपोज स्विकारले होते. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. २७ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री आणि डांसर नताशा सर्बियामध्ये राहणारी आहे. नताशा नच बलिए टी.व्ही. शोमध्येही दिसली आहे. जिथे पंड्याने तिला मत देण्याचे आवाहन केले होते.

ट्रेंडिंग घडामोडी-

-फक्त १ सामना नीट खेळले नाही आणि आयपीएलचे कायमचे उपविजेते झालेले ५ संघ

-ज्या सामन्यात विकेटकीपर होते, त्याच सामन्यात विकेट्स घेणारे ३ खेळाडू

-थेट भारतीय सैन्यदलाचा भाग होऊन देशसेवा करणारे ४ भारतीय क्रिकेटर्स

You might also like