fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

थेट भारतीय सैन्यदलाचा भाग होऊन देशसेवा करणारे ४ भारतीय क्रिकेटर्स

Indian Cricketers Who Are Associated With Indian Defence Forces

भारतीय क्रिकेटपटू क्रिकेटमध्ये तर पारंगत आहेतच, याबरोबर ते अन्य क्षेत्रातही चमकताना दिसत असतात. मग ते क्षेत्र अभिनयाशी जुळलेल्या फिल्म इंडस्ट्रीपासून ते देशाच्या रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या सीमारेषेवरील सेनादल क्षेत्रापर्यंत विस्तारलेले आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर, भारताचा माजी वेगवान गोलंदाज हा हा तमिळ इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकत आहे. शिवाय, भारताचा विश्वचषक विजेता क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा हा पोलिस क्षेत्रात आपली जबाबदारी सांभालत आहे.

अनेक क्रिकेटपटू वेगवेगळ्या व्यवसायात उतरले आहेत. काही हाॅटेल तर काही रियल इस्टेट.

परंतु, या लेखात आपण पायदल, वायुदल किंवा नौदलात काही दिवस आपल्या देशाची सेवा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंविषयी जाणून घेणार आहोत.

Indian Cricketers Who Are Associated With Indian Defense Forces

कपिल देव  (लेफ्टनंट कर्नल)

भारताला पहिल्यांदा विश्वविजेता बनवणारा कर्णधार कपिल देव यांना भारताच्या महान अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. कपिल यांना भारतीय सैन्यातील मानद पदवी देण्यात आली होती. ते २००८मध्ये प्रादेशिक सैन्याचे लेफ्टनंट कर्नल होते.

सचिन तेंडुलकर (ग्रुप कॅप्टन)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. त्याला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. आपल्या खेळीने चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या सचिनने वायुदलातही काम केले आहे. २०१०मध्ये सचिनची भारतीय वायु सेनेतील मानद ग्रुप कॅप्टनपदी निवड झाली होती.

एमएस धोनी (लेफ्टनंट कर्नल)

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने भारतीय संघाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. लहानपणीपासून क्रिकेटचे वेड असणाऱ्या धोनीचे एकेकाळी आर्मीत भरती होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे धोनीला २०११चे विश्वचषक जिंकल्यानंतर प्रादेशिक सैन्यातील लेफ्टनंट कर्नलची मानक पदवी देण्यात आली होती. २०१९ विश्वचषकानंतर धोनीने लष्करासोबत सरावदेखील केला आहे.

शिखा पांडे (फ्लाइट लेफ्टनंट)

भारतीय पुरुष क्रिकेट संघासह भारतीय महिला क्रिकेट संघाचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळाच रुतबा आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू शिखा पांडेदेखील भारतीय सैन्यदलाचा भाग आहे. ती भारतीय वायु सैन्यामध्ये फ्लाइट लेफ्टनंट म्हणून काम करते.

ट्रेंडिंग लेख-

कपिल देव, सुनिल गावसकरपासून ते गौतम गंभीरपर्यंत, जाणून घ्या कशी घेतली या भारतीय खेळाडूंनी निवृत्ती

मैदानाबाहेर दिग्गज क्रिकेटपटूंकडून घडलेले ५ लाजिरवाणे प्रसंग; जाणून…

१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय…

You might also like