मेजर क्रिकेट लीगच्या (Major Cricket League) फायनल सामन्यात स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) संघानं सॅन फ्रान्सिस्को संघाला पराभूत केलं आणि 2024चे मेजर क्रिकेट लीगचे जेतेपद पटकावले. या सामन्यात कर्णधार स्टीव्ह स्मिथनं झंझावाती अर्धशतकी खेळी केली. तर अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) संघासाठी मोलाचं योगदान दिलं. वाॅशिग्टन फ्रिडमनं सॅन फ्रान्सिस्को संघाला फायनल सामन्यात 96 धावांनी धूळ चारली.
सॅन फ्रान्सिस्कोनं टाॅस जिंकून वाॅशिग्टन फ्रिडमला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात वाॅशिग्टनं फ्रिडमनं 5 गडी गमावून 207 धावा केल्या. त्यामध्ये कर्णधार स्मिथनं 52 चेंडूत 88 धावांची आक्रमक खेळी खेळली. त्याच्या खेळीत त्यानं 7 चौकारांसह 6 षटकार ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 169.23 राहिला. तर अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं 22 चेंडूत 40 धावांची तुफानी खेळी केली. त्यामध्ये त्यानं 4 उत्तुंग षटकार ठोकले तर 1 चौकार लगावला.
𝐓𝐡𝐞 𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧𝐬! ✨#MLC2024 | #CognizantMajorLeagueCricket | #T20 pic.twitter.com/daKPqglyge
— Major League Cricket (@MLCricket) July 29, 2024
208 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला सॅन फ्रान्सिस्को युनिकाॅर्न्स संघ सर्वबाद 111 धावाचं करु शकला. त्यामध्ये कार्मी ले राॅक्स हा फलंदाज फक्त सर्वाधिक 20 धावांची खेळी खेळू शकला. तर अन्य कोणताही फलंदाज 20 धावांची खेळी देखील करु शकला नाही. वाॅशिग्टनं फ्रीडम संघासाठी मार्को जॅन्सन आणि रचिन रवींद्र यांनी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अँड्रीव टाय 2 आणि सौरभ नेत्रावळकर, ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आणि संघाला सामना जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित, विराट, श्रेयस श्रीलंकेत पोहोचले; वनडे मालिकेसाठी लवकरच सरावालाही करणार सुरुवात
पॅरिस ऑलिम्पिक: अर्जुन बबुताचा निशाना थोडक्यात चुकला..! एअर रायफलमध्ये गमावलं पदक
“गोलंदाजीच्या क्षमतेमुळे रियान परागला…” माजी भारतीय खेळाडूचा मोठा दावा