---Advertisement---

गुलाबी चेंडू नकोच! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाजाचा गुलाबी चेंडूला विरोध

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याने काही दिवसांपूर्वी सर्व कसोटी सामने गुलाबी चेंडूने खेळविण्यात यावे असे म्हटले होते. त्यासाठी त्याने काही कारणे सांगितली होती. मात्र, आता ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथने वॉर्नच्या या मताशी असहमती दर्शवली आहे. कसोटी क्रिकेट लाल चेंडूनेच खेळले जावे, असेच स्पष्ट मत स्मिथने मांडले.

वॉर्नने केली होती मागणी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली दिवस-रात्र कसोटी ऍडलेड येथे संपन्न झाली. त्यानंतर शेन वॉर्नने एका मुलाखतीत म्हटले होते की, “मी गेली अनेक वर्ष सर्व कसोटी सामने गुलाबी चेंडूने खेळावे असे म्हणतो आहे. लाल चेंडू २५ षटकांनंतर गोलंदाजीच्या फायद्याचा राहत नसेल तर, गुलाबी चेंडूने सामने खेळण्यास काय हरकत आहे. गुलाबी चेंडू खेळाडू आणि प्रेक्षकांना दिसण्यास सोपा जातो. तसेच, त्यामुळे सामन्यातील रंगत टिकून राहते.”

स्मिथने दर्शवली नापसंती
वॉर्नने केलेल्या या मागणीनंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथचे एक वक्तव्य समोर आले आहे. ज्यामध्ये स्मिथ वॉर्नच्या मताशी असहमती दर्शवताना दिसून येतोय. स्मिथ म्हणाला, “वैयक्तिकरीत्या मला विचाराल, तर मी म्हणेल गुलाबी चेंडूने सर्व कसोटी सामने खेळण्याचा पर्याय चुकीचा आहे. कसोटी क्रिकेट जिवंत ठेवायचे असेल, तर लाल चेंडूच कसोटी सामन्यासाठी वापरण्यात यावा. एखाद्या मालिकेत एखादी कसोटी हे ठीक आहे. मात्र, सर्व सामने गुलाबी चेंडूने खेळणे व्यवस्थित वाटणार नाही. ऍडलेडमध्ये आम्ही ज्याप्रकारे खेळ दाखवला तो विलक्षण होता.”

स्मिथला चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात मिळून केवळ दोन धावा करता आल्या होत्या. सध्या स्मिथ कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. मालिकेतील दुसरी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या एमसीजीवर खेळवली जाईल. ऑस्ट्रेलियाला मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याची, तर भारताला मालिका बरोबरीत आणण्याची संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

द्रविड भारतीय फलंदाजांच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार? राजीव शुक्लांनी दिले ‘हे’ उत्तर

भाई साहब इतनी अंग्रेजी! कैफच्या ‘त्या’ ट्विटवर हरभजनची मजेदार कमेंट

‘द वॉल’च्या तालमीत क्रिकेटचे धडे गिरवणारा ‘हा’ पठ्ठ्या असेल भारताची ‘सलामी’ तोफ; लवकरच होणार पदार्पण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---