---Advertisement---

विराटला गोलंदाजी करताना पाहून स्मिथलाही फुटले हसू, गमतीने केली गोलंदाजीची नक्कल; पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, ऑक्टोबर 22, 2021 12:55 AM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सध्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी बुधवारी (२० ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात सराव सामना पार पडला. या सराव सामन्यात एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे विराट कोहलीची गोलंदाजी. त्याला गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला त्याचे हसू आवरता आले नव्हते.

या सामन्यात विराट फलंदाजी करणार नव्हता, तसेच रोहित शर्मा विराटऐवजी कर्णधार म्हणून मैदानात उतरला होता. पण, या सामन्यादरम्यान विराटने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी केली. विराटने ७ वे आणि १३ वे षटक फेकले. दरम्यान, विराटने ७ व्या षटकात ४ आणि १३ व्या षटकात ८ अशा दोन षटकांत मिळून १२ धावा दिल्या. विराटने तब्बल ५ वर्षांनी टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली. त्याने यापूर्वी २०१६ टी२० विश्वचषकात अखेरची गोलंदाजी केली होती.

दरम्यान, या सामन्यात विराट जेव्हा पहिल्यांदा गोलंदाजीसाठी आला, तेव्हा ७ व्या षटकावेळी ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी करत होते. यावेळी विराटची गोलंदाजी शैली पाहून फलंदाजी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला आश्चर्य वाटले आणि तो त्याला पाहून हसू लागला. याबरोबरच त्याने विराटच्या गोलंदाजी शैलीची नक्कल करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

https://twitter.com/shubham00211591/status/1450807654796849154

https://twitter.com/manisekhar_g/status/1450773834534064129

भारतीय संघाला सध्या ६ व्या गोलंदाजी पर्यायाची चिंता सतावत आहे. कारण, हार्दिकच्या गोलंदाजी करण्यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे भारतीय संघ अन्य कोणते पर्याय आहेत का, याचा विचार करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात नाणेफेकीवेळी रोहित म्हणाला होता की, संघ ६ व्या गोलंदाजी पर्यायाचा शोध घेत आहे. अशा परिस्थितीत विराटकडे ६ वा गोलंदाजी पर्याय म्हणून पाहिले जात आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या टी२० विश्वचषकात भारतीय संघ २४ ऑक्टोबर रोजी आपल्या अभियानाला सुरुवात करेल. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांविरुद्ध झालेले सराव सामने भारताने जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

बांगलादेशने नोंदवला टी२० विश्वचषकातील सर्वात मोठा विजय; पीएनजीचा पराभव करत सुपर-१२ मध्ये केला प्रवेश

भारीच! सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ला मिळतोय चांगलाच प्रतिसाद; सेहवागने ओलांडला लाखो फॉलोअर्सचा टप्पा

पाकिस्तानविरुद्ध इरफान पठाणने निवडली भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’; इशान किशन, आर अश्विनला दिला डच्चू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---