---Advertisement---

‘मला धक्काच बसला’, पंतचा बॅटींग मार्क पुसण्याच्या आरोपानंतर स्टीव्ह स्मिथची प्रतिक्रिया

On: गुरूवार, जानेवारी 14, 2021 12:37 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यान चर्चेत राहणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्यातीलच एक म्हणजे या सामन्याच्या शेवटच्या दिवशी स्टीव्ह स्मिथचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात अनेकांनी केलेल्या दाव्यानुसार तो भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा बॅटींग मार्क हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. आता याबाबत खुद्द स्मिथनेच मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ ज्या प्रकारे व्हायरल झाला आणि त्यावर ज्या प्रतिक्रिया आल्या, त्याबद्दल स्मिथने नाराजी व्यक्त केली आहे.

स्मिथने म्हटले आहे की ‘मला या प्रकारे आलेल्या प्रतिक्रियांमुळे धक्का बसला आहे आणि मी निराश झालो. आपण कुठे गोलंदाजी करतोय, फलंदाज ती गोलंदाजी कशी खेळतायेत, याचा विचार करण्यासाठी मी अशा गोष्टी सामन्यांदरम्यान करत असतो आणि मी नेहमीच्या सवयीप्रमाणे माझे सेंटर मार्क करतो.’

नक्की काय झाले होते? 

सोमवारी(११ जानेवारी) व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असे दिसत होते की ड्रिंक्स ब्रेक दरम्यान ४९ क्रमांकाची जर्सी घातलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळपट्टीवर जाऊन क्रिजवरील भारतीय फलंदाजाचे बॅटिंग मार्क पायाने पुसत आहे. त्यावेळी रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत होते. क्रिजवरील बॅटिंग मार्क पुसल्यानंतर पंत तिथे फलंदाजी करण्यासाठी आलेलाही या व्हिडिओमध्ये दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ऑस्ट्रेलियन संघांमध्ये ४९ क्रमांकाची जर्सी स्मिथ वापरतो, त्यामुळे स्मिथच्या खेळ भावनेवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित झाली.

पुन्हा एक नवीन व्हिडिओ आला समोर –

सोमवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला, यात स्मिथने सेंटर मार्क करतानाची पूर्ण घटना दिसत आहे. यात ब्रेक दरम्यान ग्राऊंड्समनने क्रिजवरील पट्टे मारल्यानंतर स्मिथ तिथे आलेला दिसत आहे. यानंतर तो मार्क बनवत असल्याचे दिसत आहे, त्यानंतर तिथे रिषभ पंत फलंदाजीसाठी येतो. ‘

टीम पेनने दिले स्मिथला समर्थन – 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने स्मिथला समर्थन दिले आहे. त्याने म्हटले की स्मिथ जाणून बुजून पंतचा मार्क पुसत नव्हता. तो म्हणाला, ‘मी याबाबत स्टीव्ह स्मिथशी बोललो आहे. हे सर्व ज्या प्रकारे सर्वांसमोर आले, त्यामुळे तो निराश झाला आहे. जर तुम्ही स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेट कसा खेळतो हे पाहिले असेल तर लक्षात येईल तो सामन्यातील प्रत्येक दिवशी ५ ते ६ वेळा असे करतो. तो असं खुपदा करतो. तो नेहमीच क्रिजमध्ये असतो. आम्हाला माहित आहे ही स्मिथच्या नेहमीच्या सवयींपैकी एक आहे. त्यातील एक म्हणजे तो नेहमी त्याचे मार्क बनवत असतो.’

महत्त्वाच्या बातम्या –

AUS v IND : निर्णायक चौथ्या कसोटीत पाऊस बनणार व्हिलन? पाहा कसे असेल ब्रिस्बेनचे हवामान

कमालच! केवळ ३६ चेंडूत शतक करत सोफी डिवाईनने मोडला ११ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम, पाहा व्हिडिओ

बीसीसीआय समोर अखेर झुकले ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड, हॉटेलमध्ये खेळाडूंना मिळाल्या ‘या’ सुविधा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---