क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूंच्या डोक्याला चेंडू लागल्याच्या घटना बऱ्याचदा पाहायला मिळतात. त्यातही खालच्या फळीत फलंदाजीसाठी येणाऱ्या खेळाडूंना चेंडूचा मारा सहन करावा लागतो. कारण सहसा गोलंदाज खालच्या फळीत फलंदाजी करत असतात. नुकत्याच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या दिवसरात्र कसोटी सामन्यात खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागल्याची आणि चक्कर आल्याची घटना घडली होती. तेव्हापासून शॉर्ट बॉल किंवा बाउंसर चेंडू टाकण्यावर बंदी घालण्यात येण्याच्या विषयावर जोरदार चर्चा चालू आहे.
माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज इयान चॅपल यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. खालच्या फळीतील फलंदाजांना चेंडूच्या माऱ्यापासून वाचवण्यासाठी कठोर नियम बनवण्यात येण्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथने यास विरोध दर्शवला आहे.
एसईएन मॉर्निंग्सशी बोलताना स्मिथ म्हणाला की, “सध्या इयान चॅपल प्रत्येक सामन्यानंतर विचित्र विधाने करत आहेत. माझ्या दृष्टीने पाहिले तर बाउंसर चेंडू खेळाचा एक भाग आहे. बाउंसर चेंडूमुळे मैदानावर फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात चांगला संघर्ष पाहायला मिळाला आहे. मला नाही वाटत की, याला तुम्ही बेकायदेशीर घोषित करू शकता. मला वेगवान गोलंदाजांच्या खालच्या फळीला बाउंसर चेंडू टाकण्यात कसलीही हरकत नाही.”
ऍडलेड कसोटी सामन्यानंतर २६ डिसेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात होईल. मेलबर्नच्या मैदानावर हा सामना होणार असून ३० डिसेंबर रोजी सामना संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2021: ‘मिस्टर आयपीएल’ रैनासह ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई सुपर किंग्जमधून आऊट
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर
“बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर मात करायची आहे, तर ‘असा’ सराव करा”