ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि खेळाडू अॅडम गिलख्रिस्ट यांना अपेक्षा आहे की, राष्ट्रीय निवड समितीने स्टीव्ह स्मिथच्या कर्णधारपदाबद्दल स्पष्ट बोलावे. दिग्गज खेळाडू अॅडम गिलख्रिस्ट म्हणाले की, “जर बोर्ड स्मिथला भविष्यात नेतृत्व देण्याचा विचार करत असेल तर त्याला उपकर्णधार करण्याचे पाऊल योग्य दिशेत असेल.
2018 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणी दोन वर्षासाठी स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्व करण्यावर बंदी घातली. आणि त्यानंतर पुनरागमन करताना स्मिथने जबरदस्त कामगिरी केली आहे.
भविष्याच्या दृष्टीने स्मिथ व्हावा उपकर्णधार
फॉक्स क्रिकेट सोबत बोलताना अॅडम गिलख्रिस्ट म्हणाले, “मला कोणते असे कारण दिसत नाही, ज्यामध्ये दुसऱ्या कोणाला संधी मिळाली पाहिजे. जर नेतृत्व करण्यासाठी स्टीव्ह स्मिथ योग्य उमेदवार आहे तर मी असे कोणते कारण बघत नाही की ज्यामुळे त्याला ही संधी मिळू मिळू नये. जर ऑस्ट्रेलिया क्रिकेटला आणि निवड समितीला असे वाटत असेल तर स्टीव्ह स्मिथ या जबाबदारीसाठी तयार आहे. तर मला वाटते की लगेच त्याला उपकर्णधार करायला हवे.”
नुकतेच स्मिथ म्हणाला होता की, संघात त्याच्या पहिल्या स्थानावर परतल्या नंतर चर्चा सुरू झाली आहे. गिलख्रिस्ट म्हणाले.” यानंतर ही जेव्हा अशी संधी येईल, पेन आणि फिंच या जबाबदारी मधून मुक्त होतात, तेव्हा स्मिथ सहजपणे नेतृत्वाचा स्विकार करू शकतो. ”
ऑस्ट्रेलियाने नुकतेच पॅट कमिन्स याला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी कमिन्स आणि हेड हे संयुक्तपणे उपकर्णधार होते.
संबंधित बातम्या:
– म्हणून स्मिथने करावे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व; माजी दिग्गजाने सांगितले कारण
– पुन्हा ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद स्वीकारण्यास स्मिथ तयार? म्हणाला
– स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद सोपवल्यास; ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक मॅथ्यू वेडचे मोठे विधान