लंडन। द ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्वबाद 329 धावा केल्या असून पहिल्या डावातील 69 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी 399 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी(14 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथने इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस वोक्सचा एका हाताने शानदार झेल घेतला.
वोक्स इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 87 व्या षटकात 6 धावांवर फलंदाजी करत असताना मिशेल मार्शने टाकलेल्या चेंडूवर त्याच्या बॅटची कड लागली आणि चेंडू स्लीपच्या दिशेने गेला. त्यामुळे दुसऱ्या स्लीपला थांबलेल्या स्मिथने चपळाईने त्याच्या उजवीकडे उडी मारत एका हाताने शानदार झेल घेतला. त्याच्या या झेलमुळे वोक्सला त्याची विकेट गमवावी लागली.
Great catches from the Aussies tbf
Scorecard/Videos: https://t.co/L5LXhA6aUm#Ashes pic.twitter.com/tT9Lc2pnBt
— England Cricket (@englandcricket) September 14, 2019
या सामन्यात स्मिथने क्षेत्ररक्षणाबरोबरच फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 80 धावांची खेळी केली. त्याच्याबरोबरच मार्नस लॅब्यूशानेबरोबर त्याने तिसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद 225 धावां करता आल्या.
तत्पूर्वी इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 294 धावा केल्या होत्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होणाऱ्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल सर्वकाही…
–इंजिनियर्स डे विशेष: क्रिकेटमधील ते ११ इंजिनियर…
–निवृत्तीचा निर्णय मागे घेतलेला अंबाती रायडू झाला या संघाचा कर्णधार