सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. लंडन येथील ओहल मैदानावर हा सामना खेळला जात असून पहिल्या दोन दिवसावर ऑस्ट्रेलिया संघाने वर्चस्व गाजवलेले दिसते. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ 16 जून पासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची ऍशेस कसोटी मालिका खेळणार आहे. या प्रतिष्ठेच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ याने एक मोठे वक्तव्य केले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्मिथ याने आपला दर्जा पुन्हा एकदा दाखवून दिला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ मोठी धावसंख्या उभारु शकला. आगामी ऍशेस मालिकेतही ऑस्ट्रेलिया संघाला त्याच्याकडून अशीच अपेक्षा असणार आहे. याच मालिकेविषयी बोलताना तो म्हणाला,
“इंग्लंड संघ खेळत असताना नेहमी बॅझबॉल क्रिकेटची चर्चा होत असते. यामध्ये इंग्लंडचा संघ आक्रमक क्रिकेट खेळण्यावर भर देतो. मात्र, अशा खेळपट्ट्यांवर ते आमच्याविरुद्ध तीच रणनिती कायम ठेवतात का, हे पाहावे लागेल. त्यांना इतर संघांविरुद्ध असे खेळताना यश आले असले तरी, आमच्या गोलंदाजीविरुद्ध त्यांनी असा खेळ दाखवलेला नाही.”
उभय संघातील पाच सामन्यांची ही मालिका 16 जूनपासून सुरू होईल. मालिकेतील पहिला सामना ऍजबस्टन येथे खेळला जाईल. मागील ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत केले होते. यावेळी घरच्या मैदानावर विजय मिळवण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्न करेल.
ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, जोश हेजलवूड.
(Steve Smith Talk On England Bazball Cricket For Ashes 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा ‘प्लॅन एप्रिल’ यशस्वी! WTC फायनलसाठी करत होते खास तयारी
बोलॅंडच्या गोलंदाजीने प्रभावित झाला दादा! म्हणाला, “तो एकटाच आपल्याला फायनलमध्ये…”