ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या धाकड फलंदाजांमध्ये स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने यांचे आवर्जुन नाव घेतले जाते. हे दोन्ही फलंदाज केवळ मैदानावर नव्हे तर मैदानाबाहेरही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. ऑस्ट्रेलिया संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये लॅब्यूशाने आणि स्मिथ यांची चांगलीच चर्चाही रंगत असते. त्यांच्यातील नात्याला पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्यांच्यात ब्रोमान्स चालू असल्याचे सांगितले आहे. आता स्मिथने याविषयी आपले मत मांडले आहे.
ऑस्ट्रेलियातील ७ क्रिकेट ऑनलाइन चॅनेलने पोस्ट केलेल्या व्हिडिओत बोलताना स्मिथ म्हणाला की, “मला तर याविषयी कसलीही माहिती नव्हती. मी आणि लॅब्यूशाने एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतो. आम्हाला आमच्या खेळाविषयी चर्चा करायला आवडते. कारण क्रिकेटविषयी आम्हा दोघांचे विचार खूप जुळतात. तसेच आम्हा दोघांनाही कॉफी प्यायला फार आवडते. पण आमच्यातील या नात्याला ब्रोमान्स असे म्हणता येणार नाही.”
https://twitter.com/7Cricket/status/1346324295669092353
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर यासंदर्भात बोलताना म्हणाला की, स्मिथ बऱ्याचदा लॅब्यूशानेला त्याच्या खोलीत बोलवण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने त्यांच्यात ब्रोमान्स चालू असल्याचा दावा केला आहे. “मी निश्चितपणे लॅब्यूशाने आणि स्मिथ यांच्यात ब्रोमान्स चालू असल्याचे सांगू शकतो. हे खूप अजब आणि नाटकीय आहे. तुम्ही त्यांना एकत्र कॉफी प्यायला जाताना पाहू शकता. सोबतच ते एकमेकांचे सॅलड खाताना दिसतात. असे असले तरी, ते एकमेकांना भेटले याचा मला आनंद आहे.”
एवढेच नव्हे तर, ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायन म्हणाला की, “स्मिथ आणि लॅब्यूशाने यांच्यात नक्कीच ब्रोमान्स चालू आहे. पण सर्वांना वाटते की, लॅब्यूशाने स्मिथवर प्रेम करतो. पण माझ्या मते, स्मिथ लॅब्यूशानेवर खूप जास्त प्रेम करतो. ते मैदानावर तसेच हॉटेलच्या खोलीपर्यंत जाताना एकमेकांची सावली असल्यासारखे एकत्र असतात, हे दृश्य पाहून खूप विचित्र वाटते.”
महत्त्वाच्या बातम्या-
सिडनी कसोटीत रोहित शर्मा ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी, रहाणेने केला खुलासा
क्वारंटाइन नियमामुळे निर्माण झालेल्या वादावर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
तिसर्या कसोटी सामन्यात ‘हा’ २२ वर्षीय खेळाडू डेविड वॉर्नरबरोबर करु शकतो सलामीला फलंदाजी