---Advertisement---

कसोटी क्रमवारी: सिडनी कसोटीतील झुंजार शतकाचा स्मिथला फायदा, विराटला पछाडत घेतली ‘या’ स्थानी उडी

On: मंगळवार, जानेवारी 12, 2021 12:49 PM
---Advertisement---

नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जागतिक कसोटी फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर या क्रमवारीत काही बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज स्टिव्ह स्मिथ याने सिडनी कसोटीत शतक आणि अर्धशतकी खेळी केली होती. या धडाकेबाज फलंदाजीचा त्याला फायदा झाला असून त्याने कसोटी क्रमवारीत दुसरे स्थान गाठले. तसेच भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा यानेही आगेकूच केली आहे.

आयसीसीने मंगळवारी (१२ जानेवारी) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. सिडनी कसोटी सामन्यानंतर घोषित करण्यात आलेल्या क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ९१९ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. तर भारताविरुद्ध सिडनी कसोटीच्या पहिल्या डावातील १३१ धावा आणि दुसऱ्या डावातील ८१ धावांच्या जबरदस्त फटकेबाकीनंतर स्मिथने एका स्थानाची प्रगती केली आहे.

यापुर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर होता. परंतु आता स्मिथने ९०० गुणांसह विराटला पछाडत दुसऱ्या स्थानावर ताबा मिळवला आहे. यामुळे विराटची (८७० गुण) तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्यूशाने आणि पाकिस्तानचा बाबर आझम अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कायम आहेत.

याव्यतिरिक्त भारताचा कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा याने २ स्थानांची प्रगती केली आहे. पुजाराने सिडनी कसोटीतील दोन्ही डावात अनुक्रमे ५० आणि ७७ धावा केल्या आहेत. त्यामुळे ७५३ गुणांसह तो दहाव्या स्थानावरुन आठव्या स्थानी आला आहे. तर कर्णधार अजिंक्य रहाणे सहाव्या स्थानावरुन घसरत सातव्या स्थानावर आला आहे.

सोबतच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरची ३ स्थानांनी घसरण झाली असून तो दहाव्या क्रमांकावर आहे. याउलट न्यूझीलंडचा क्रिकेटपटू हेन्री निकोल्स ३ स्थानांची झेल घेत टॉप-१० मध्ये आला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय संघाने सामना अनिर्णित राखल्यानंतर ‘अशी’ होती स्टीव स्मिथची प्रतिक्रिया, म्हणाला…

डर्टी गेम केल्यानंतर हे तर होणारच होतं! सिडनी कसोटीत सामनावीर ठरल्यानंतर चाहत्यांनी स्मिथला म्हटलं ‘गद्दार’

“स्मिथ अशा गोष्टी नेहमीच करतो”, पंतचा बॅटींग मार्क पुसण्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर टीम पेनची मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---