जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले होते. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469, तर भारताने 296 धावा केल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 बाद 123 धावा केल्या. फिरकीपटू रविंद्र जडेजा दुसऱ्या डावात चांगल्या लयीत दिसत आहे. जडेजाने शुक्रवारी स्टीव स्मिथची विकेट घेताच मोठा विक्रम केला.
जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्यात स्टीव स्मिथ (Steve Smith) याने शतक ठोकले. पहिल्या डावात त्याने 268 चेंडूत 121 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. दुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलियन संघ आणि चाहत्यांना स्मिथकडून अशाच खेळीची अपेक्षा होती. मात्र, रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या फिरकीपढे स्मिथ यावेळी टिकू शकला नाही. 47 चेंडूत 34 धावा करून त्याने विकेट गमावली. या विकेटच्या जोरावर जडेजा स्मिथविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारा दुसरा गोलंदाज बनला. त्याने तब्बल 8 वेळा स्मिथला मैदानाबाहेर धाडले आहे.
स्टीव स्मिथविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्यांचा विचार केला, तर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड पहिल्या क्रमांकावर आहे. ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 9 वेळा स्मिथची विकेट मिळवली आहे. यासाठी त्याला 24 सामने खेळावे लागले. यादीत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या जडेजाने 13 कसोटी सामन्यांमध्ये 8 वेळा स्मिथची विकेट घेतली. यादीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकांवर अनुक्रमे रविंचंद्रन अश्विन आणि जेम्स अँडरसन यांचा क्रमांक आहे. या दोघांनीही प्रत्येकी 8 वेळा स्मिथची विकेट घेतली. पण यासाठी त्यांना खेळलेल्या कसोटी सामन्यांची संख्या मात्र वेगवेगळी आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव स्मिथला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज
9 – स्टुअर्ट ब्रॉड (27 कसोटी)
8 – रविंद्र जडेजा (13 कसोटी)
8 – रविचंद्रन अश्विन (16 कसोटी)
8 – जेम्स अँडरसन (25 कसोटी)
7 – यासीर शाह (7 कसोटी)
सामन्याचा एकंदीरत विचार केला, तर तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियन संघ 296 धावांनी आघाडीवर आहे. मार्नस लाबुशेन (41*) आणि कॅमरून ग्रीन (7*) खेळपट्टीवर कायम आहेत आणि एकूण 6 विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या हातात आहेत. दुसरीकडे भारताला मात्र झटपट विकेट्स घेण्याची आवश्यकता आहे. शनिवारी (10 जून) पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांचे प्रदर्शन सामन्यावर प्रभाव टाकणारे ठरू शकते. (Steve Smith was dismissed by Ravindra Jadeja for the 8th time in his Test career)
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स