ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ याने ऍशेस 2023 दरम्यान झालेल्या दुखापतीची माहिती दिली. स्मिथला ऍशेस मालिकेतील दुसऱ्याच सामन्यात दुखापत झाली होती. पण तरीही त्याने मालिकेतील पुढचे तिन्ही सामने खेळले. त्याच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली होती.
यावर्षीची ऍशेस मालिका इंग्लंडमध्ये खेळली गेली. मालिका 2-2 अशा बरोबरीत सुटल्यामुळे ऍशेस ट्रॉफी ऑस्ट्रेलियाने रिटेन केली. मात्र, 2001 नंतर ऑस्ट्रेलियन संघ अद्याप इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका जिंकू शकला नाही. यावर्षी त्यांच्याकडे मालिका जिंकण्याची चांगली संधी होती. पण यावेळीही इंग्लंड संघाने जबरदस्त पुनरागमन केल्यामुळे मालिका नावावर करता आली नाही. स्टीव स्मिथ (Steve Smith) याचे ऍशेस 2023 मधील प्रदर्शन कौतुकास पात्र ठरले. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्मिथच्या बॅटमधून 110 धावांची महत्वपूर्ण खेळी आली होती. पण याच सामन्यात त्याच्या मनगटाला दुखापत झाल्याचे स्मिथने सांगितले.
नुकतीच स्मिथने या दुखापतीविषयी माहिती दिली. दिग्गज फलंदाज म्हणाला की, “मला ही दुखापत लॉर्ड्सवर झाली होती. मला खरोखर ही क्षण आठवत नाही की, हे कधी झाले. पण जेव्हा ही दुखापत झाली, तेव्हा मी मैदानात होतो. त्यादिवसी रात्री मी ही दुखापत पाहिली. मी म्हणलो, अरे मी हे काय करून घेतले. माझे मनगट दुखत होते आणि सुज देखील आली होती.”
स्मिथने पुढे सांगितले की, “मी पुढचा सामनाही खेळलो. ओल्ड ट्रेफर्ड स्टेडियमवर खेळताना मला कॉर्टिसोन (इंजेक्शन) लावले गेले. परत (ऑस्ट्रेलियामध्ये) आल्यावर मी पाहिले की, दुखापत अद्याप ठीक झाली नाहीये. मला अजूनही खूप साऱ्या गोष्टी व्यवस्थित करता येत नाहीयेत. माझे अजून एक स्कॅन झाले. मनगटाला एक छोटी जखम झाली होती आणि सोबतच इतर काही गोष्टीही होत्या.”
दरम्यान, याच दुखापतीमुळे स्मिथला मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सामील केले गेले नाहीये. उभय संघांतील टी-20 मालिका 30 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 3 सप्टेंबर रोजी संपेल. उभय संघांतील वनडे मालिका 7 ते 17 सप्टेंबर यादरम्यान खेळली जाईल. आगामी वनडे विश्चषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला भारतात यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. स्मिथ या मालिकेसाठी फिटनेस मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. विश्वचषकासाठी त्याची भूमिका संघासाठी महत्वाची असणार आहे. असात हे तीन सामने त्याच्यासाठी महत्वाचे ठरू शकतात. (Steve Smith was injured in the Lord’s Test. But still he played the entire Ashes)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकविजेत्या दिग्गजाने रोहित-आगरकरांना सुनावले, आशिया चषकाचा संघ निवडताना केली ‘ही’ मोठी चूक
रोहित शर्मा आहे तिलकची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम! युवा फलंदाजाकडून मिळालेल्या मदतीचा खुलासा