भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स या मालिकेत खेळत नसल्याने स्मिथच्या खांद्यावर कर्णधारबदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसऱ्या सामन्याच्या सुरुवातील त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रित केले. स्मिथ या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील हा दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणममध्ये खेळला जात आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यासाठी उपलब्ध झाला असून भारताकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा वर्तवली जात आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा स्टीव स्मिथ देखील संघासाठी महत्वपूर्ण खेळी करू शकतो. स्मिथने या सामन्यात 61 धावा केल्या, तर तो आपल्या 5000 वनडे धावा पूर्ण करेल.
विशाखापट्टणममध्ये त्याने या 61 धावा केल्या, तर त्याला याचा विशेष लाभ मिळणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी सर्वात कमी डावांमध्ये 5000 धावा करणारा दुसरा फलंदाज स्मिथ बनू शकतो. ऑस्ट्रेलियासाठी सर्वात कमी डावांमध्ये 5000 वनडे धावांचा विक्रम दिग्गज डेविड वॉर्नर (David Warner) याच्या नावावर आहे. वॉर्नरने अवघ्या 115 वनडे डावांमध्ये ही कामगिरी केली होती. यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऍरॉन फिंच (Aaron Finch) आहे ज्याने 126 डावांमध्ये स्वतःच्या 5000 धावा पूर्ण केल्या होत्या. रविवारी (19 मार्च) स्मीथने 61 धावांची खेळी केली, तर तो देखील 126 डावांमध्ये ही कामगिरी करू शकतो.
स्मिथची वनडे कारकीर्द –
स्मिथच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत 140 वनडे सामन्यांतील 125 डावांमध्ये 4939 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 44.90 राहिली असून 12 शतके आणि 29 अर्धशतकांच्या मदतीने त्याने या धावा केल्या आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शम.
ऑस्ट्रेलिया: ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन ऍबॉट, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, ऍडम झंपा.
(Steve Smith will make a big record in Visakhapatnam)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL 2023 । एलिस पेरीकडून स्मृती मंधानाचे कौतुक, जाणून घ्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलूला काय भावले
अष्टपैलू खेळी दाखवत शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा बनला पीएसएल चॅम्पियन, कायनर पोलार्डचा संघ पराभूत