इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस 2023 मालिका रंगात आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याचा निकाल थेट मालिकेवर मालिकाचा निकाल ठरवणारा ठरू शकतो. कारण इंग्लंडने पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ याच्यासाठी हा सामना महत्वपूर्ण ठरणार आहे.
स्टीव स्मिथ (Steve Smith) आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना हेडिंग्लेमध्ये (Headingley Test) खेळणार आहे. या सामन्यात मोठी खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असणार आहे. ऍशेस 2023चा पहिला सामना एजबस्टन स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सने जिंकला होता. पण स्मिथ या सामन्यात 16 आणि 6 धावा करून बाद झाला होता. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मात्र स्मिथने ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर शतक ठोकले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 32 वे शतक होते.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतके करण्याच्या बाबदीत स्मिथने स्टीव वॉ यांची बरोबरी केली असून माजी कर्णधार रिकी पाँटिंगपेक्षा काहीच शतके दूर आहे. लॉर्ड्सवरी प्रदर्शनासाठी स्मिथला सामनावीर पुरस्कार मिळाला. अशाच पद्धतीने हेडिंग्ले कसोटीही आठवणीत ठेवण्यासाठी तो मोठ्या खेळीची अपेक्षा करत आहे. कारण स्मिथच्या कारकिर्दीतील हा 100वा कसोटी सामना आहे. आतापर्यंतची कसोटी कारकिर्द पाहता स्मिथचे प्रदर्शन सर्वोत्तम राहिले आहे.
स्टीव स्मिथने आपल्या कसोटी कारकिर्दीत 175 डावांमध्ये 59.55च्या सरारसीने 9113 धावा केल्या आहेत. कारकिर्दीतील 99 कसोटी सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करण्याचा मान स्मिथला मिळाला आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर ब्रायन लारा आहेत, ज्यांनी 174 डावांमध्ये 8833 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर युनिस खान आहे, ज्याने 8594 धावा केल्या आहेत. श्रीलंका संघाचा कुमार संगकारा चौथ्या क्रमांकावर असून त्याने 166 डावांमध्ये 8572 धावा केल्या आहेत. भारतीय दिग्गज राहुल द्रविड या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. द्रविडने 167 डावांमध्ये 8492 धावा केल्या होत्या. (Steve Smith will play his 100th Test match at Headingley Stadium)
महत्वाच्या बातम्या –
‘मी आजही खेळू शकतो…’, विराटचं नाव घेत कमबॅकविषयी काय म्हणाला डिविलियर्स
सूर्यकुमार आणि सरफराज दुलीप ट्रॉफीत फेल! भारतीय संघातूनही बाहेरच