गुरुवारी आयपीएल 2019 मध्ये इडन गार्डनवर कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानने 3 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान राखले आहे.
या सामन्यात कोलकताने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून 17 वर्षीय रियान परागने 31 चेंडूत 47 धावांची सर्वोच्च खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र तो स्वत:चीच बॅट स्टम्पला लागल्याने बाद झाला. त्यामुळे त्याचे आयपीएलमधील पहिले अर्धशतकही थोडक्यात हुकले.
19 व्या षटकात कोलकताकडून आंद्रे रसल गोलंदाजी करत असताना त्याने पाचवा चेंडू शॉर्ट बॉल टाकला. यावेळी रियान फलंदाजी करत होता. त्याने या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा फटका हुकला आणि बॅट स्टंम्पला लागली. त्यामुळे बेल्स पडल्या.
तसेच चेंडू इतका उंची गेला की यष्टीरक्षण करत असलेल्या कार्तिकलाही तो पकडता आला नाही. त्या चेंडूने बाउंड्री लाईन पार केल्याने राजस्थानला चौकार मिळाला. मात्र रियानची विकेटही गमवावी लागली. रियानची अशी विकेट गेल्याने राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथही चकीत झाला होता.
रियान या सामन्यात राजस्थानची 3 बाद 63 धावा अशी बिकट अवस्था असताना फलंदाजीसाठी आला होता. तो फलंदाजीसाठी आल्यानंतर लगेचच बेन स्टोक्सही बाद झाल्याने राजस्थान 4 बाद 78 धावा असा संघर्ष करत होते.
पण त्यानंतर रियानने राजस्थानचा डाव सांभाळताना स्टुअर्ट बिन्नीसह 20, श्रेयस गोपालसह 25 आणि जोफ्रा आर्चरसह 44 धावांची भागीदारी केली. अखेर आर्चरने शेवटच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार मारत राजस्थानला 19.2 षटकातच 176 धावांचा टप्पा गाठून दिला आणि या स्पर्धेतील चौथा विजय मिळवून दिला.
https://twitter.com/Shivam_Sharma33/status/1121606070122602496
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषकासाठी संधी न मिळालेला अजिंक्य रहाणे आता खेळणार या संघाकडून
–महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व, असे आहेत सर्व संघ
–या क्रिकेट लीगमधून शेन वॉटसनने केली निवृत्तीची घोषणा