आजच्या जमान्याप्रमाणे क्रिकेटलाही गती आली आहे. आजकाल लोकांना टी-२० सारख्या झटपट आणि तडाखेबाज क्रिकेट स्वरुपामध्ये जास्त रस आहे. परंतु सर्वात जुना क्रिकेट प्रकार अर्थातच कसोटी क्रिकेटची बातच न्यारी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूचा खरा कस लागतो. टी-२०च्या युगात लोकं कसोटी क्रिकेटकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे(आयसीसी)ने कसोटी क्रिकेटला अजून चालना मिळावी यासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच आयोजन केले होते.
गेली २ वर्षे चालत आलेली ही स्पर्धा भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्याने संपली. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ विकेट्सने बाजी मारली आणि ते कसोटी क्रिकेटचे चॅम्पियन बनले. दरम्यान, स्टार स्पोर्ट्स वाहिनीने या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी खास मतदान घेतले होते. ज्यामध्ये २१व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी कर्णधार कोण, फलंदाज कोण, गोलंदाज कोण आणि अष्टपैलू खेळाडू कोण? असे प्रश्नांवर चाहत्यांना मतदान करायचे होते.
यातील सर्वोत्तम कर्णधाराच्या स्पर्धेत नामांकन मिळालेले खेळाडू होते रिकी पाँटिंग, स्टिव्ह वॉ, ग्रॅमी स्मिथ आणि विराट कोहली. यामध्ये सर्वात जास्त मतदान स्टिव्ह वॉला मिळाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार वॉला २१व्या शतकातील सर्वोत्तम कर्णधार म्हणून निवडण्यात आले. वॉने ऑस्ट्रेलियासाठी ५७ कसोटीत ४१ सामन्यात विजय प्राप्त केला आहे.
स्टार स्पोर्ट्ससोबत याबद्दल चर्चा करताना माजी भारतीय फलंदाज संजय बांगर सांगतात की, “मलासुद्धा सर्वोत्तम कसोटी कर्णधार निवडण्यास सांगितले तर, मी स्टिव्ह वॉवॉला निवडेन. वॉ असा कर्णधार होता जो विरुद्ध संघावर नेहमी दबाव आणून खेळत असे. या मतदानात जेवढ्या कर्णधारांना नामांकन मिळाले होते. ते सर्वच कर्णधार सरस आहेत. परंतु, वॉने एक वेगळीच संस्कृती तयार केली होती.”
दरम्यान, स्टार स्पोर्ट्सने या मतदानात कोणताही भेदभाव होऊ नये यासाठी ५० सदस्यांची नेमणूक केली होती. ज्यामध्ये सुनील गावस्कर, गौतम गंभीर, इयान बिशॉप, हरभजन सिंग, शेन वॉटसन, स्कॉट स्टॉयरिस आणि अजून इतर दिग्गज खेळाडू तसेच क्रिकेटचे प्रशिक्षक आणि पत्रकार होते. स्टार स्पोर्ट्सने त्यांचा ट्विटरवरून चाहत्यांसाठी सुद्धा मतदान करण्यासाठी १५ ते १७ जूनदरम्यान संधी दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा विश्वचषक जिंकल्यानंतर विरोधी संघाकडून दारु उधार घेत ‘कपिल पाजीं’नी केले होते सेलिब्रेशन
धोनीच्या भिडूचा ‘फुटबॉल किक रनआऊट’ तूफान व्हायरल, तुम्हीही घ्या पाहून
लंकादहन करण्यासाठी ‘यंग ब्लू आर्मी’ होतेय सज्ज, बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ