---Advertisement---

वादळासारखा वेग आणि घातक यॉर्कर, SRHचा ईशान मलिंगा नक्की आहे तरी कोण?

On: शनिवार, एप्रिल 12, 2025 9:02 PM
---Advertisement---

ईशान मलिंगाने पंजाब किंग्स विरुद्ध शनिवारी 12 एप्रिल रोजी आयपीएलमध्ये पदार्पण केलं, सनरायझर्स हैदराबाद संघात सामील असलेला श्रीलंकाच्या ह्या वेगवान गोलंदाजाने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली आणि फक्त तीन धावा दिल्या.

ईशानने श्रीलंका क्रिकेट संघासाठी फक्त वन-डे फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने पाच वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एकाच सामन्यात तीन विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय त्याने 16 फर्स्ट क्लास सामन्यात 39 आणि लिस्ट ए के 19 सामन्यात 24 विकेट्स घेतलेल्या आहेत. ईशान मलिंगाने 16 टी20 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आयपीएल आधी साउथ आफ्रिका 20 लीग मध्ये तो खेळलेला आहे.

ईशानने साऊथ आफ्रिका 20 लीग 2025 मध्ये पार्ल रॉयल्स तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने चार विकेट्स घेतले होत्या. ईस्टर्न कॅप विरुद्ध त्याने 21 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या होत्या.
सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या मेगा लिलावात ईशान मलिंगाला 1.20 करोड रुपयांना खरेदी केले होते.

श्रीलंकाचा वेगवान गोलंदाज ईशान मलिंगाने 12 एप्रिल रोजी पंजाब किंग्स विरुद्ध राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं.
ईशान मलिंगाने आयपीएल मधील पदार्पण सामन्यात पहिल्याच षटकात प्रभसीमरन सिंगला बाद केले, ही त्याची आयपीएल पदार्पण विकेट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---