यावर्षी भारतीय संघ आयसीसी वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. वनडे विश्वचषकाचे सामने भारतातील 10 वेगवेगळ्या स्टेडियमवर आयोजित होणार आहेत. पण काही राज्यांच्या क्रिकेट बोर्डांना एकाही विश्वचषक सामन्याचे यजमानपद मिळाले नाहीये. असात या राज्य क्रिकेट बोर्डांवर अन्याय झाल्या भावना तयार होत होती. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर देखील उपाय शोधला आहे.
आगामी वनडे विश्वचषकाचे यजमानपद न मिळालेले क्रिकेट बोर्ड आणि त्यांच्या स्टेडियमसाठी बीसीसीआयने खास नियोजन आखले आहे. विश्वचषकानंतर भारतात होणाऱ्या द्विपक्षीय वनडे मालिका त्याच स्टेडियमवर खेळवल्या जातील, ज्याठिकाणी वनडे विश्वचषकाचे सामने आयोजित केले गेले नाहीत. 2023 वनडे विश्वचषकाचे सामने दिल्ली, धरमशाला, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, बेंगलोर आणि लखनऊ यायठिकाणी खेळले जाणार आहेत. अशात आगामी कालात भारतात होणाऱ्या वनडे मालिकांपैकी एकही मालिका या स्टेडियमवर होणार नाही, असेच जय शहा () यांच्याकडून समजते. ज्या स्टेडियमवर वनडे विश्वचषकाचे सामने खेळले जाणार नाहीत, त्याठिकाणी आघामी वनडे सामने खेळवले जातील. याविषयी शहांनी सर्व राज्यांच्या क्रिकेट बोर्डांसोबत चर्चा केली आणि सर्वांच्या सम्मतीने हा निर्णय घेतला गेला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार जय शहा म्हणाले, “आमच्या बैठकीत मी आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या सामन्यांचे न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी एक उपाय सुचवला होता. सराव सामन्यांचे यजमानपद भूषणाऱ्या आसाम आणि केरळला सोडून इतर राज्य क्रिकेट बोर्डांना विनंती केली की, द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिकांमधील वनडे मालिकांचे यजमानपदचा आपला क्रमांक त्यांनी स्वइच्छेने सोडावा. हा प्रस्ताव त्या राज्या क्रिकेट बोर्डांसाठी ठेवला गेला होता, ज्यांना दुर्दैवाने विश्वचषकाचे यजमानपद मिळाले नाहीये.”
दरम्यान, भारतात आयोजित होणारा वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. भारतीय संघ विश्वचषकातील आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना 18 नोव्हेंबर रोजी अयोजित केला जाईल. चाहत्यांमध्ये आतापासूनच वनडे विश्वचषकासाठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. (story bcci has a plan for state units that missed out on WC games to be compensated during bilateral home season)
महत्वाच्या बातम्या –
‘मी जर भारताकडून खेळलो असतो, तर 1000 विकेट्स…’, पाकिस्तानी गोलंदाजाचे खळबळजनक विधान
“भारत-पाकिस्तान सामन्याला दर्जा राहिला नाही”, माजी कर्णधाराची तिखट प्रतिक्रिया