इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात नवी फ्रॅंचाईजी असलेल्या लखनऊ सुपरजायंट्सने सोमवारी (३१ जानेवारी) आपल्या अधिकृत लोगोचे अनावरण केले. त्यांचा हा लोगो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. लखनऊ संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा लोगो प्रदर्शित केला. तसेच या लोगोसह त्यांनी एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये या लोगोच्या मागील कहाणी सांगण्यात आली आहे.
ही आहे लोगो मागील कहाणी
लखनऊ सुपरजायंट्स संघाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून संघाच्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या नव्या लोगोमध्ये भारताच्या ध्वजात असलेले तीन रंग दिसत आहेत. तसेच क्रिकेटचे प्रतीक म्हणून बॅट व बॉल देखील या लोगोमध्ये सामील आहेत. संघाने लोगो प्रदर्शित केल्यानंतर आणखी एक पोस्ट केली. यामध्ये या लोगो मागील कहाणी सांगितली आहे. लखनऊ सुपरजायंट्सच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की,
Here's the story behind our identity. 🙌#LucknowSuperGiants #IPL pic.twitter.com/4qyuFeNgsR
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 31, 2022
‘भारतातील नव्या आयपीएल फ्रॅंचाईजीची ओळख भारतीय पुराणांतून प्रेरित आहे. पुराणातील गरुड या पक्षाप्रमाणे शक्ती आणि सुरक्षेचे हे प्रतीक आहे. त्या पक्षाचे पंख आम्ही संघाच्या लोगोमध्ये समाविष्ट करत आहोत. हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. भारतीय ध्वजाच्या तीन रंगातील हे पंख आम्ही यामध्ये सामील केले आहेत.
पक्षाचे अंग बनवताना क्रिकेटची प्रतीके म्हणून लाल चेंडू व बॅट वापरले आहे. लाल चेंडू आणि त्यावरील भगवी सीम ‘विजय तिलक दर्शवतात.
संघाची ओळख असलेला हा लोगो सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. यामुळे अधिकाधिक यश मिळवण्याची प्रेरणा मिळते. लखनऊ सुपरजायंट्स सर्व भारतीयांचा संघ आहे जो भारताची एकात्मता दर्शवतो.’
सर्वात महागडी फ्रॅंचाईजी आहे लखनऊ
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती संजिव गोयंका हे या संघाचे मालक आहेत. लखनऊ सुपरजायंट्स इतिहासातील सर्वात महागडी फ्रॅंचाईजी आहे. लखनऊ संघाने आयपीएल ड्राफ्टमध्ये केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस व रवी बिश्नोई यांना आपल्या ताब्यात सामील करून घेतले आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर या संघाचा मेंटर असेल. तर झिम्बाब्वेचे दिग्गज ऍण्डी फ्लॉवर संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. नुकतेच भारताचे नेतृत्व केलेला राहुल या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळेल.
महत्वाच्या बातम्या-